शिराळा,ता.१२:शिराळा तालुक्यातील सेतू व महा -ई सेवा केंद्रामधून सर्वसामान्य जनतेची व विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी सेतू चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी शिराळा तहसीदार कार्यालय समोर आज भारतीय दलित महासंघाच्यावतीने एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.दरम्यान सेतू व महा -ई सेवा केंद्राच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीवर कारवाई करण्यासाठीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे लेखी पत्र महसूल प्रशासनाने आंदोलकांना दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
शिराळा तालुक्यातील सेतू व महा -ई सेवा केंद्राद्वारे सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात असून विविध दाखल्यासाठी जबरदस्तीने शासनाने जाहीर केलेल्या अधिकृत रकमेव्यतिरिक्त अवाजवी रक्कम घेतली जात आहे. संबंधित सेतू चालकांची लाचलुचपत विभागामार्फत खातेनिहाय चौकशी करून त्यांना देण्यात आलेले सेतू केंद्राचे परवाने रद्द करण्यात यावे. या मागणीचे निवेदन तहसिलदार शिराळा यांना देणेत आले होते .परंतु संबंधितांची कोणतीही चौकशी अथवा कारवाई केलेली नाही .शिराळा तालुक्यातील सेतू व महा- ई -सेवा केंद्रातील गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्यावतीने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यातआली होती. त्या नुसार आज शिराळा तहसिल कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दरम्यान तहसीदार शामला खोत यांनी आंदोलकांची भेट घेवून निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा करून तसे लेखी पत्र आंदोलकांना दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी शिराळा तालुका अध्यक्ष दयानंद शिवजातक,सांगली जिल्हा उपाध्यक्ष विनोद आढाव, दिलिप मोरे, विशाल खांडेकर,निलदीप कांबळे, अमोल बडेकर, धनाजी तुपारे, गणेश थोरात, शशिकांत कांबळे, विनोद कांबळे, नेताजी दाभाडे, मानसिंग आडके , हर्षवर्धन कांबळे,सिद्धार्थ कांबळे,सुशांत कांबळे,पिराजी थोरवडे,ज्योतिअदित्य कांबळे उपस्थित होते.
भारतीय दलित महासंघाने केलेल्या मागणी नुसार परवाना धारक सेतू व महा -ई सेवा केंद्राची तपासणी करण्यासाठी दोन नायब तहसीलदार व पाच अव्वल कारकून यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करू
शामला खोत-पाटील तहसीदार
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments