आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
शिराळा ,ता.२१ : येथे उद्या सोमवारी २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमीची तयारी पूर्ण झाली असून शिराळ्यात येणाऱ्या भाविकांच्यासाठी स्वागतासाठी शिराळा नागरी सज्ज झाली आहे. या सणासाठी प्रशासनाने पोलीस व वन विभाग अशा ६०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस व वनविभागयांचे शिराळा शहर व मिरवणूक मार्गावर संचालन झाले.
नागपंचमी सणा पूर्वी प्रतिबंधात्मक कार्यवाही साठी १२५ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. दहा गस्ती पथके आहेत. वनविभागाच्यावतीने व्हिडिओ चित्रीकरण , ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सोशल मिडियावर करण्यात येणाऱ्या गतीविधींवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षा स्थापन केला आहे. पोलिस प्रशासनाकडून १ आयपीएस अधिकारी, २ पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक १०, सहायक पोलिस निरीक्षक ३५, पुरूष पोलिस कर्मचारी ३५५ , महीला पोलिस कर्मचारी ५० , असे एकूण कर्मचारी ४०५ , वाहतूक पोलीस कर्मचारी ४०, ध्वनीमाफक यंत्र १२, व्हिडिओ कॅमेरे १४, एक दंगलविरोधी पथक ,एक घातपात विरोधी पथक ,एक श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.
शिराळा आगाराच्यावतीने ५३ व बाहेरील आगाराच्या २० अशा ७३ गाड्यांचे नियोजन केले आहे. शिराळा -इस्लामपूर, शिराळा-बांबवडे , शिराळा- कोकरूड,शिराळा-कोडोली या मार्गावर ज्यादा बस सोडण्यात आल्या आहेत. शिराळा -इस्लामपुर जाणारी वाहतुक शिराळा येथून कापरी, कार्वे , लाडेगाव मार्गे व इस्लामपुर शिराळा 'येणारी वाहतूक पेठ नाकामार्गे एकेरी केली आहे. त्यासाठी साई मंगल कार्यालय , शिराळा- कोकरूड मार्गावर विश्वासराव नाईक कॉलेज , वाकुर्डे- शिरशी मार्गावर पाडळी रोड येथे तात्पुरते बसस्थानक सुरु केले आहे.विद्युत वितरणने नागपंचमीला अखंडीत विद्युत पुरवठा सुरु राहण्यासाठी पर्यायी फिडर वर खेड फाटा व बिरोबा मंदिर येथे नवीन ए.बी.स्वीच कार्यान्वित केला आहे. शिराळा बस स्थानक,कापरी नाका,आंबामाता मंदिर, मरिमी चौक, नायकुडपुरा, लक्ष्मी चौक, तळीचा कोपरा, नगरपंचायत ,गुरुवार पेठ, नवजीवन वसाहत येथे प्रत्येक ठिकाणी दोन विद्युत कर्मचारी नियुक्त केले आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने नगरपंचायत,बस्थानक, शनि मंदिर, व्यापारी असोसिएशन ,समाज मंदिर, नायकूडपुरा ,तळीचा कोपरा येथे सात आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. सपर्दंशची ११०० लस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. खेळणी, खाद्यपदार्थ ,पाळणे व इतर मनोरंजनाची दुकाने दाखल झाली आहेत.
प्रथमच डिजिटल बॅॅनरचा उच्चांक
आगामी नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व नागपंचमी उत्सव यामुळे राजकीय पक्ष व युवा नेत्यांच्या डिजिटल बॅॅनरने शिराळा शहराच्या हद्दी पर्यंत प्रथमच उच्चांक गाठला आहे. अनेकांच्यात बॅॅनर उंचीच्या स्पर्धा सुरु आहेत.
0 Comments