BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला| शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला | Leopard attack on farmer



धनाजी पाटील :ऐतवडे खुर्द 

 करंजवडे तालुका वाळवा येथे जनावरांना  गवत कापत असताना बिबट्याकडून अचानक झालेल्या  हल्ल्यात अशोक (वसंत) बाबुराव पाटील वय ४८ हा  शेतकरी जबर जखमी झाला आहे. त्याच्या  डोक्यावर व  छातीवरती बिबट्याच्या नखांचे ओरखडे आहेत.त्यांना  कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेऊन पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथे नेण्यात आले आहे.  या घटनेने करंजवडे सह परिसरात भयानक भीतीचे वातावरण पसरले आहे.

           याबाबत घटनास्थळा वरून समजलेली माहिती अशी, करंजवडे येथील अशोक (वसंत) बाबुराव पाटील आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुरवकी  नावाच्या मळ्यात जनावरांना  चारा आणावयास गेले होते. दरम्यान त्यांनी उसाच्या पिकाला पाणीही लावले होते. उसाच्या पिकाला पाणी लावून त्यानंतर ते बांधावरती गवत कापत असताना अचानक समोरून बिबट्याने झडप घातली. त्यावेळी  बिबट्याचा  एक पंजा  अशोक यांच्या डोक्यावरली  टॉवेलमध्ये व दुसरा  छातीवरती होता. बिबट्याच्या नखांमुळे शरीर  रक्तबंबाळ झाले. डोक्यावरती टॉवेल असल्याने डोके शाबूत राहिले.  पाटील यांनी प्रतिकार केल्याने   बिबट्याने तिथून पळ काढला. त्या झटापटीत पाटील यांच्या  अंगावरील सर्व कपडे फाटलेले व रक्ताने माखलेले आहेत. त्या नंतर पाटील यांना कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.वनक्षेत्रपाल महंतेश बगले व कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून  पंचनामा केला. त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. पाटील यांना  वन विभागाने  इस्लामपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments