BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदिवासी पारधी समाजाची एकजुटीची ताकद निर्माण करणार - सुधाकर वायदंडे |Adivasi Pardhi will create the strength of unity of society - Sudhakar Waydande



शिराळा,ता.२३ :दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाची मजबूत बांधणी करून एकजुटीची ताकद निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे सुधाकर वायदंडे यांनी केले. ते शिराळा येथे आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या नवीन पदाधिकारी निवडी प्रसंगी बोलत होते.

  यावेळी आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या प.महा कार्याध्यक्ष जितेंद्र काळे,प.महा.उपाध्यक्ष टारझन पवार,प.महा संपर्क प्रमुख इंद्रजित काळे,सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल काळे,जि.उपाध्यक्ष घायल काळे,प.महा महिला आघाडी अध्यक्ष निर्मला काळे,सांगली म.आ.जि. अध्यक्ष रोशना काळे, म.आ जि. उपाध्यक्ष मालन पवार यांच्या वायदंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन या निवडी करण्यात आल्या. 

  यावेळी वायदंडे म्हणाले,पिढ्यानपिढ्या गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या व डोंगर,दऱ्यात राहणाऱ्या पारधी समाजाला माणसांत आणण्याचे ऐतिहासिक काम दिवंगत प्रा.मधुकर वायदंडे यांनी केलेले आहे.  त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सर्व मूलभूत हक्कापासून वंचित असणाऱ्या पारधी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी २००१  साली प्रा. वायदंडे यांनी आदिवासी पारधी हक्क अभियानाची स्थापना केलेली आहे. पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे,सर्व शासकीय योजनानांचा लाभ देण्यात यावा, आदिवासी प्रकल्प विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी,पारधी समाजातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी  तसेच अन्य प्रलंबित मागण्याबाबत लढा उभा करण्यासाठी आदिवासी पारधी हक्क अभियानाची मजबूत बांधणी करून एकजुटीची ताकद निर्माण करणार आहे. 

   यावेळी दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पोपटाराव लोंढे,दिनकर नांगरे, चिरंजीव मोरे,प्रभाकर तांबीरे आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जि.उपाध्यक्ष राकेश काळे,अवी भोसले,शिराळा तालुकाध्यक्ष दिकल पवार,चार्जिंग पवार,भीमा पवार, शेखर काळे, गिलाट्या पवार,गुलछडी काळे,अमोल पवार,पंप्या काळे,जागृती पवार,लांजी काळे,अश्विनी पवार, नागेश पवार उपस्थित होते.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

----------------------------------------





 



























Post a Comment

0 Comments