BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्लॉटचा प्रश्न मार्गी लावून पूरग्रस्तांना न्याय द्या |Solve the plot issue and give justice to the flood victims



शिराळा,ता,१४:  सागाव (ता.शिराळा) येथील  पूरग्रस्तांचा बऱ्याच दिवसांपासून  प्लॉटचा प्रलंबित प्रश्न शासनाने तात्काळ मार्गी लावून,पूरग्रस्तांना न्याय द्यावा असे प्रतिपादन  आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

   शिराळा येथे तहसील कार्यालयात सागाव येथील पूरग्रस्त संघर्ष समितीच्या  बैठकीत बोलत होते. यावेळी तहसीलदार शामला  खोत- पाटील उपस्थित होत्या.यावेळी नाईक म्हणाले, २००५,२०१९ व २०२१ च्या महापुराचा  फटका सागाव गावातील बहुतांशी कुटुंबाना  बसला आहे. त्यांच्या घरांची,जनावरांची मोठी हानी झाली आहे.  पूरग्रस्त  शासनाकडे प्लॉट मिळावा म्हणून मागणी करीत आहेत.परंतु शासनाने या प्रलंबित प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. कणेगावच्या धर्तीवर सागावातील सर्व्ह नंबर ४ व ९ मध्ये या पूरग्रस्तांना प्लॉट देऊन न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा.

 तहसीलदार  खोत- पाटील म्हणाल्या,पूरग्रस्तांची प्लॉट मिळावा ही मागणी रास्त असून,येथील पूरग्रस्तांच्या मागणीचा आम्ही गांभीर्याने विचार करु. येथील पूरग्रस्तांची यादी सर्व्ह करून शासनाकडे पाठवली जाईल.

        यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त प्लॉट संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार शामला खोत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यावेळी बाजार समितीचे संचालक संग्राम पवार, माजी सरपंच तात्या पाटील, विश्वासचे संचालक बाबासो पाटील, जयसिंग पाटील, सुशांत पाटील, उदय पाटील,दता तानवडे, मंदार पवार, अभिजीत पवार,अभिजीत पाटील, भिमराव पवार,सुभाष पवार, महादेव पवार, अतुल पवार,श्रीकांत दिवे, तुषार कांबळे, आप्पासो सातपुते, समीर सातपुते उपस्थित होते.

 आम्हाला न्याय द्या  

 सागाव येथे २००५,२०१९,२०२१ यावर्षी आलेल्या महापुराने बहुतांशी कुटुंबाच्या घरात  पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली. काहींची घरेच जमिनोदोस्त होऊन,संसार उघड्यावरती आले आहेत. निदान उघड्यावरती पडलेल्या संसारांचा तरी शासनाने गांभीर्याने विचार करून,पूरग्रस्तांचा  प्लॉटचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून न्याय द्यावा. 

 संग्राम पवार   (अध्यक्ष,पूरग्रस्त संघर्ष समिती,सागाव




 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments