शिराळा,ता.१६ :वाकुर्डे बुद्रुक ( ता.शिराळा) येथील सुरज भगवान कांबळे ( वय २६ ) या युवकाचा घरातील नळपाणी कनेक्शनची विद्युत मोटार सुरू करताना विजेचा शॉक बसून मृत्यू झाला.सदर घटना आज बुधवार रोजी सकाळी नऊ च्या दरम्यान घडली.याबाबत अर्जुन कांबळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की , सुरज हा घरातील नळ कनेक्शनला बसवलेली विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागला. यानंतर तातडीने त्यांना शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले .मात्र त्यापूर्वी मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलीस नाईक एस.आर.पाटील हे करीत आहेत. त्याच्या पश्चात आई व विवाहित बहीण असा परिवार आहे. सुरजच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे घरची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे तो गवंडी काम करत होता. वृद्धापकाळाची काठीच हरपल्याने त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकुलत्या एका मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments