BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ब्राझीलच्या ऊस स्वच्छता तंत्रज्ञानाचा वापर करा | Use Brazilian sugarcane cleaning technology



 शिराळा,ता.१४: विश्वासराव नाईक साखर कारखान्याने ब्राझीलचे  ऊस स्वच्छता तंत्रज्ञानाचा वापर करून  कमी खर्चात प्रती टन उतारा वाढून कारखान्याची आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन ब्राझीलच्या चेन्स ब्राझील या कंपनीचे प्रकल्प संचालक मार्शिओ शिल्वा यांनी केले. 

    चिखली ( ता.शिराळा) विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यास  दिलेल्या  सदिच्छा भेटी प्रसंगी  बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे मुख्य ऊस सल्लागार डॉ. आर. बी. डौले , कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक , संचालक विराज नाईक,भाषा अनुवादक प्रदीप तवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  मार्सिओ म्हणाले की,मी येथील कार्यपद्धत शिकत आहे.आमचाअनुभव तुम्हाला सांगण्यास उत्सुक आहे. तुमच्या आडीअडचणी  व समस्या सोडवून. गाळपासाठी साठी आणलेल्या उसाचा पालापाचोळा व माती वेगळी करण्याचा कमी खर्चातील ऊस स्वच्छता तंत्रज्ञान महत्वाचे आहे .ते  अधिक स्वस्त आहे. एका टनाला  ८० किलो माती व पालापाचोळा  निघतो . तुमच्या लोकांना ब्राझील मध्ये पाठवून त्याचा अभ्यास करा. आम्ही सर्व सहकार्य करू.

 आमदार नाईक म्हणाले, १५  वर्षांपूर्वी  ब्राझील मध्येही अगोदर ऊस पेटवून नंतर गाळपासाठी नेत होते.मात्र आता त्यांनीही नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. ब्राझीलचे हे प्रगत तंत्रज्ञान विश्वास कारखान्यात नक्की राबविले जाईल. गळीत हंगाम सुरु झाल्यावर  तज्ञांनी या कारखान्याची पाहणी करून त्या नुसार  प्रकल्प उभारणीस सहकार्य करावे. 

  संचालक विराज नाईक म्हणाले ,जगात ब्राझील हे साखर उत्पादनात अग्रेसर आहे. त्याठिकाणी ९८ टक्के क्षेत्रातील ऊस तोडणी  हार्वेस्टर मशीनच्या सह्याने केली  जाते .त्या ठिकाणी २० वर्षा पासून फ्लेक्स इंजिनवर गाड्या सुरु आहेत. ब्राझील येथील उस तंत्रज्ञानाचा  विश्वास कारखान्यात जास्ती जास्त वापर करू.

     यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील, दीपक पाटील, राजारामबापू पाटील कारखान्याचे खरेदी अधिकारी सिताराम कोरडे,सचिव सचिन पाटील,युवराज गायकवाड , संचालक दिनकरराव पाटील व सर्व संचालक, खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते. संचालक विजयराव नलवडे यांनी आभार मानले.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments