शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील १४,मांगरूळ ५, बेलेवाडी १, अस्वलेवाडी १, रीळे २ अशी एकूण २३ बंद असलेली घरे , एका रात्रीत चोरट्यांनी फोडून सुमारे १ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. सातारा पोलिसांनी परिसरातील घरफोडी मधील संशयित आरोपी सुरदेव सिलोन नानावत, परदुम सिलोन नानावत रा. घोटवडे ता.मुळशी, राम धारा बिरावत रा. करमोळी ता.मुळशी, जिल्हा. पुणे या ३ आरोपींना अटक केली होती. त्यांचा ताबा कोकरूड पोलीसांनी घेवून न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की,सातारा जिल्ह्यातील भुईंज, मेढा,वाई, वाटार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ घरफोड्या झाल्या होत्या.या चोरीतील ३ संशयित आरोपींना सातारा एल.सी.बी.च्या टीमने अटक केली होती.त्यांचा ताबा कोकरूड पोलिसांनी घेतला असून आरोपींना शिराळा न्यायालयात हजर केले असता, त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.चोरट्यांनी एका रात्रीत बिळाशी येथील बंद असलेल्या १४ घरांची कुलुपे तोडून १ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.तसेच मांगरूळ येथील ५ बंद घरे, बेलेवाडी येथील २ अशी एकूण २३ बंद असलेल्या घरांची कुलूपे तोडून चोऱ्या केल्या आहेत.
बिळाशी येथील सीसीटीव्ही मधे दोन मोटार सायकलसहीत सहा चोरटे दिसून आले होते. यावरून पोलिसांचा तपास सुरू होता. त्यातच सातारा एल.सी.बी.च्या टीमने ३ संशयित आरोपींना अटक केली होती.त्यांचा ताबा कोकरूड पोलिसांनी घेतला असून हद्दीतील झालेल्या घरफोड्यांचा तपास करण्यात येणार आहे.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments