शिराळा ,ता.१८: नागपंचमी देखावा शिल्प इथून पुढे शिराळ्याच्या जगप्रसिद्ध नागपंचमीच्या इतिहासाची साक्ष देत राहील. हे शहर आणखी सुंदर होण्यासाठी जास्तीत जास्त निधी देणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
शिराळा शहरातील १ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात निमित्त ते गणपती चौक येथे बोलत होते. सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माने म्हणाले, गणपती चौकात उभारलेले नागपंचमी देखावा शिल्प म्हणजे जिवंत नागपंचमीची साक्ष देत उभा असल्याचा भास होतो आहे. शिराळ्याच्या नागपंचमीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती परंपरा काय आणि कशी होती याची प्रचिती देणारे हे शिल्प आहे. अतिशय उत्कृष्ट असा हा शिल्प कलेचा नमुना आहे. येथील नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही याला निधी दिला आहे. अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना शहरात राबविल्या गेल्या आहेत. भुईकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला दीड कोटी रुपयांचा निधी दिला असून ते काम देखील लवकर सुरू होईल. त्यामधे देखील असाच इतिहास आणि परंपरा जपत असलेला भाव असेल. आपल्या विकसनशील शहराला यापुढे देखील विकाकामांसाठी निधी देऊ.
यावेळी रणजितसिंह नाईक, सागर मालगुंडे, के. डी. पाटील, हणमंतराव पाटील, अभिजीत नाईक,हरिभाऊ कवठेकर,केदार नलवडे, सीमा कदम, कुलदीप निकम, संभाजी नलवडे, संतोष गायकवाड, शिवाजी शिंदे, महादेव गायकवाड, हेमंत कबाडे, जालिंदर बेंद्रे, सुरेश कदम, जितेंद्र पटेल, राजीव पाटील, नारायण शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील उपस्थित होते.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments