शिराळा,ता.१३: शिराळा तालुक्यात लवकरच मेळावा आयोजित करा .मी स्वतः यावेळी हजर राहून कार्यकर्त्यांना ताकद देईन .शिराळा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणखी मजबूत करू असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
इस्लामपूर येथे शिराळा व वाळवा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते. यावेळी माजी मंत्री विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, माजी आमदार मोहनराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी चव्हाण म्हणाले, मातोश्री प्रमीला चव्हाण पूर्वीच्या कराड लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असताना शिराळा तालुका नेहमीच आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. माजी आमदार भगवानराव पाटील यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती.आता त्यांच्या वारसांनी पक्ष हातात घेतला आहे, याचा आपणास आनंद होत आहे.
तालुका अध्यक्ष ॲड.रवि पाटील म्हणाले, 'मोदींची काँग्रेसमुक्त भारतचे स्वप्न शिराळा तालुक्यापासून सुरुवात करत आहे' अशी दुर्दैवी घोषणा करणाऱ्यानी काँग्रेस सोडल्यानंतर सर्वसामान्य जनतेने काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे शिराळा तालुका काँग्रेस पूर्वीच्याच ताकदीने ठामपणे उभा आहे.मोरणा धरण निर्मिती,जिल्हा मजूर फेडरेशन,शिराळा एस.टी. डेपो आदी पायाभूत सुविधांची जडणघडण झाली.गेल्या ७० वर्षात तालुक्यासाठी काँग्रेसचे झालेले योगदान जनता विसरलेली नाही.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments