BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

क्रिकेट स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल प्रथम |New English School first in cricket competition


शिराळा,ता.११: शिराळा नगरपंचायतने आयोजित केलेल्या  मेरी माटी, मेरा देश  उपक्रमांच्या अनुषंगाने “मिट्टी को नमन विरों को वंदन ”अंतर्गत अंतर शालेय हाप पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत  न्यू इंग्लिश स्कुलने प्रथम क्रमांक पटकावला.

  या स्पर्धा विश्वासराव नाईक महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी योगेश पाटील, उप प्राचार्य राजसिंह पाटील यांच्या हस्ते झाले.पंचप्रण शपथ घेण्यात येवून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत  सहा संघांनी सहभाग घेतला होता.पंच म्हणून  लक्ष्मण मलमे, विजय शिंदे होते. विजयी संघ असे प्रथम  क्रमांक न्यू इंग्लिश स्कुल, द्वितीय क्रमांक भारतीय विद्यानिकेतन,तृतीय क्रमांक जिल्हा परिषद उर्दू शाळा शिराळा.  विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी विद्यालयांना सहभाग प्रमाणपत्र देवून त्याचा सन्मान करण्यात आला.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

Post a Comment

0 Comments