BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नर्मदा ची ओटी भरण , डोहाळे जेवण घालून केली परिक्रमा |Narmada's oti bharan, circumambulated with dohale food



लग्न आणि त्यांनतर घरी होणारे चिमुकल्याचे आगमन हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण .त्यासाठी मोठी हौस आणि मौजमजा केली जाते. बाळाच्या जन्मा आधीच डोहाळे जेवण हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम घेतला जातो. त्यासाठी कोणीतरी येणार येणार गं..असं गुगुनत  नव्या पाहुण्याच्या आगमनाच्या  चाहूलीने सर्वच आनंदात असतात.त्यामुळे  सातव्या महिन्यात डोहाळे जेवण घालण्याची परंपरा आहे . त्यासाठी  हिरवी साडी , फुलांचा हार , फळे,ओटी हे सारे असतेच. ओटी भरणी साठी  शेजारीपाजारी महिलांना आमंत्रण धाडले जाते. यात लेक किंवा सुनेचे लाड केला जातो. मात्र शिराळा येथे ना लेक ना सून कदम कुटुंबीयांनी घातले  नर्मदा   म्हणजे चक्क  खिलार गायीचे  थाटामाटात .डोहाळे जेवण  घालून केली परिक्रमा केली.

 गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागात खिलार गायीची संख्या खूपच कमी झाली आहे . अलीकडच्या काळात खिलार गायीचे महत्व पटू लागल्याने पुन्हा शेतकरी खिलार गायीचे संगोपन करण्यावर भर देऊ लागला आहे.तालुक्यात अनेक गावात खिलार गायीची संख्या  वाढू लागली आहे . शिराळा येथील प्रताप कदम व दीपा कदम या दाम्पत्याने गायी म्हशीचे संगोपन करताना गायीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. लेकी,सुने प्रमाणे लाडक्या नर्मदा च्या  डोहाळे कार्यक्रमानिमित्त  गायीच्या अंगावर झूल घालून   फुलांच्या माळांनी सजवले. शिंगे रंगवून गळ्यात घुंगराची माळ,पायत तोडे, हिरवा- सुक्या चाऱ्यासह लाडू ,करंज्या,पशुखाद्य  यांसारखे पदार्थ ठेवण्यात आले होते . महिलांनी पंचारतीने ओवाळून ओटी भरण केले. अशा या नर्मदेच्या डोहाळे जेवणाची चर्चा सर्वत्र रंगली.




 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

Post a Comment

0 Comments