शिराळा ,ता.२१ : पावसाची उघडीप आणि तरुणांनी वाद्याच्या तालावर धरलेला ठेका यामुळे शिराळ्यात नागपंचमीचा एकच जल्लोष सुरु होता.हजारो भाविकांच्या साक्षीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शिराळची नागपंचमी घरोघरी नाग प्रतिमेचे पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार न घडता नागपंचमी शांततेत पार पडली.
सकाळी सहा वाजले पासून नागमंडळे प्रतिकात्मक नाग घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. महिलांनी ही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास प्रणव महाजन व त्यानंतर रामचंद्र महाजन यांच्या घरात नागप्रतिमा व मानाच्या पालखीचे विधिवत पूजन करून पालखी काढण्यात आली.त्या नंतर नाग प्रतिमेच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.महाजन कुटुंबाकडे नागपंचमीच्या पालखीचा मान आहे.पालखीमध्ये नागाची तांब्याची प्रतिमा पूजेसाठी देण्याचा शिराळा येथील पोतदार कुटुंबा कडे मान वंश परंपरागत आहे. ही परंपरा सुमंत पोतदार पुढे चालवत आहेत.उपजिल्हा रुग्णालय येथे शिराळा नगरपंचायतने नियंत्रण कक्ष उभारला होता. ठीक ठिकाणी स्वागत कक्ष उभारून नागमंडळाचे स्वागत करण्यात आले. शिराळा युवक संघटनेने मंडळांचे स्वागत केले.
अंबामाता मंदिर व मिरवणूक मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस अधीक्षक बसवराज तेली व मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामाणूजम यांच्या मार्गदर्शनाखाली आय.पी.एस.अधिकारी राहुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण,मनीषा कदम, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन , तहसिलदार शामला खोत -पाटील,विभागीय वनाधिकारी दिलीप भुरके,उपवनसंरक्षक निता कट्टे,सहायक वनसंरक्षक डॉ अजित साजणे, वनक्षेत्रपाल महंतेश बगले,डॉ सुनील लाड ,कमलेश पाटील, महेश झाणझुरने, इंद्रजित निकम,रणजित गायकवाड ,पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर जंगम, सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी भेट देवून या मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले. सांगली आगारचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, कामगार अधिकारी प्रवीण पाटील ,आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडली.
पोलीस व वन विभाग अशा ६०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त ठेवला होता.व्हिडिओ चित्रीकरण,ड्रोन कॅमेरे,सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सोशल मिडियावर करण्यात येणाऱ्या गतीविधींवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षा स्थापन केला होता .शिराळा आगाराने यात्रेकरू साठी ७३ गाड्यांचे नियोजन केले होते. सात आरोग्य पथके तयार होती. सपर्दंशची ११०० लस उपलब्ध होत्या.
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, खासदार धैर्यशील माने, सत्यजित देशमुख, माजी आमदार शिवाजीराव नाईक,सम्राट महाडिक,रणजितसिंग नाईक, अॅड भगतसिंग नाईक, यांनी नाग मंडळांना शुभेच्छा दिल्या.
अल्पोपाहार वाटप
शिराळा तालुका कामगार परिषदेच्या वतीने अध्यक्ष मारुती रोकडे यांनी पोलीस,विद्युत वितरण, सफाई , आरोग्य व वनविभागाच्या व इतर कर्मचाऱ्याना अल्पोपहारचे वाटप केले
गर्दीच गर्दी
पावसाने उघडीप दिल्याने यावर्षी गल्लीबोळा सह सर्व मिरवणूक मार्ग युवकांच्या गर्दीने खचाखच भरला होता. वाद्य ,नेत्रदीपक लाईट आणि कागदी फवारे यामुळे प्रत्येक मंडळांच्या मिरवणुकीत रंगत आली होती.त्या ठेक्यावर तरुणाईने बेभाम ठेका धरला होता.
-------------------------------------------------------------
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
--------------------------------------------------------------------------------
0 Comments