BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

१९ बालकांची मोफत इको तपासणी |Free echo checkup of 19 children



शिराळा,ता.११:  बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत संशयित हृदयरोग कारणासाठी संदर्भित करण्यात आलेल्या बालकांची मोफत टू डी इको तपासणी सिव्हील हॉस्पिटल सांगली  येथे एस.आर.सी.सी. हॉस्पिटल मुंबई  यांचेमार्फत करण्यात आली. या शिबिरामध्ये शिराळा तालुक्यातील १९  बालकांची मोफत इको तपासणी करून पात्र बालकांना डिवाइस क्लोजर व ओपन हार्ट शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे.. 

 आर.बी.एस.के. अंतर्गत शिराळा तालुक्यामध्ये दोन पथके कार्यरत असून यामध्ये डॉ. संदीप साळी, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. प्रियांका चव्हाण, अमोल रसाळ, सुषमा पाटील व यशश्री जाधव हे कर्मचारी कार्यरत आहेत. तालुक्यामध्ये आर.बी.एस.के. अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये एकूण २६१  अंगणवाडी व २२६  शाळांमधील एकूण ३३९६९  बालकांची आरोग्य तपासणी करून त्यापैकी २९९२  मुलांवर शाळेतच उपचार करण्यात आले. २९२०  संदर्भ सेवेस पात्र असलेल्या  बालकांना पुढील उपचारासाठी विविध रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.  तालुक्यामध्ये आत्ता पर्यंत  ८९  हृदयशस्त्रक्रिया व १३९५  इतर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

Post a Comment

0 Comments