BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोफत नेत्र व स्त्रीरोग तपासणी शिबिर |Free Eye and Gynecological Checkup Camp



टाकवे ता.शिराळा येथे  उद्या रविवारी  सकाळी दहा ते दुपारी ४ पर्यंत मोफत नेत्र व स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी हा योग साधून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक व कुटुंबिय,भारतीय सैन्य दलातील सैनिक व कुटुंबिय व इतर सर्व गरजू लोकांच्यासाठी  ग्रामपंचायत टाकवे, जागृत ग्राहकराजा संघटना महाराष्ट्र, शाखा शिराळा व जायंटस् ग्रुप शिराळा हिरकणी,जिजाऊ फाऊंडेशन पुणे-शिराळा,जाधव हॉस्पिटल शिराळा,शिराळा सखी मंच, यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळा, जय जवान आजी माजी सैनिक संघटना (उत्तर विभाग)शिराळा, पतंजली योग समिती, शिराळा यांचे संयुक्त विद्यमाने डॉ.पटवर्धन यांचे नंदादिप नेत्ररुग्णालय,सांगली यांच्या सहयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात  सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ.कृष्णा नितिन जाधव यांच्यावतीने स्त्रीरोग तपासणी होणार आहे. तरी या शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या नेत्रतपासणीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या आवश्यकता वाटल्यास नंदादिप रुग्णालय सांगली यांचे वतीने मोफत नेत्र शस्त्रक्रिया करणेत येतील. दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत चष्मे व आयड्राप्स् दिले जातील.

------------------------------------------------------




 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

Post a Comment

0 Comments