शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या आजीवन अध्ययन विभाग,(लोककला विभाग) यांच्यावतीने एक दिवशीय पारंपारिक लोककला विषयी मार्गदर्शन शिबिर व लोककला सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रम नियोजनासाठी सांगली,सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकारांनी आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सांगली शाहिरी, भजन, भारुड, कीर्तन,प्रवचन, पोतराज, संगीतकार, गीतकार, धनगरी ओव्या, पारंपारिक गीते, पिंगळा,लावणी,लोकनाट्य, बहुरूपी अशा अनेक विविध कलाकारांनी खालील गुगल फॉर्म भरून आपली नोंदणी करावी . त्या नंतर लवकरच कार्यक्रमाची माहिती कळवली जाईल .
लोक कलाकार नोंदणी फॉर्म
0 Comments