धनाजी पाटील : ऐतवडे
शिराळा.ता.१६:वाळवा तालुक्यातील चिकुर्डे -ऐतवडे खुर्दच्या मुख्य रस्त्याच्या नाल्यात देवर्डे हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत १ वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला.ही घटना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांच्या निर्दशनास आली .बिबट्याच्या मृत्यूची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी चिकुर्डे ,देवर्डे, ऐतवडे खुर्द व कुरळप परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ.अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनक्षेत्रपाल महंतेश बगळे, वनक्षेत्रपाल संतोष शिरसेटवार , वनक्षेत्रपाल मानसी पाटील, वनपाल संजय पाटील,वनरक्षक विशाल डुबल यांनी भेट दिली. बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन वंजारी यांनी केले. त्यामध्ये सदर बिबट्याचा मृत्यू हा अपघाती दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्त्राव होऊन झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचे सर्व अवयव सुस्थिती असून दत्त टेकडी येथील वनविभागाच्या आवारात दहन करण्यात आले. मागील आठ दिवसापासून कुरळप फाटा ते चिकुर्डे रोडवरील दत खडी परीसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण होते .अजून ही ऐतवडे खुर्दसह करजंवडे ,देवर्डे, कुरळप पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मंदिराच्या आसपास बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments