शिराळा,ता.१७ : देशातील पहिला पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रात व्हावा या मागणीसाठी आज शेडगेवाडी (ता.शिराळा) येथे मराठी पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्यावतीने पत्रकार संघाच्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली.
राजकीय नेत्यांचे या कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वाईट स्वरूपाचा आहे. शासकीय अधिकारी विशेषता पोलीस अधिकारी आजही या कायद्याबद्दल जाणून घ्यायला तयार नाहीत. डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यानी याचा तपास करायचा असतो. मात्र असा कायदा अस्तित्वात आहे याची अनेकांना माहिती नाही. परिणामी पत्रकारावरील हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. कोकणात एका पत्रकाराला गाडीखाली चिरडून मारण्यात आले. तर पाचोरा जिल्ह्यात आमदाराच्या गुंडाकडून भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात कणेरी मठ येथे हल्ला झालेल्या पत्रकाराच्या प्रकरणी आरोपींचा तपास सहा महिने लोटले तरी लागलेला नाही. त्यामुळे हा कायदा कुचकामी ठरला आहे .असे आमच्या सर्व पत्रकारांची भावना आहे. त्यामुळे तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने आज शेडगेवाडी येथे पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रतीची होळी केली. यावेळी पत्रकार नारायण घोडे, डॉ. दिनकर झाडे, गणेश माने, संदीप शिंदे, हिम्मतराव नाईकवडी, चंद्रकांत गुरव, मनोज मस्के, आनंदा सुतार, सुरेश शेडगे, सुरेश पवार, याकुब मुजावर, आदि पत्रकार उपस्थित होते. दरम्यान कोकरूड पोलीस ठाण्याकडून पोलिसांची उपस्थिती होती.
0 Comments