BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नागपंचमी दिवशी या वहातुक मार्गात बदल |Change in this transport route on Nagpanchami day



शिराळा येथे सोमवारी २१ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या नागपंचमी निमित्ताने शिराळ्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे नियमित रस्त्यावर वाहतूकीचा ताण पडून रहदारीस अडथळा होवू शकतो. त्यासाठी पेठनाका ते शिराळा पर्यंतचे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

शिराळा येथील नागपंचमी यात्रा २१ ऑगस्ट  रोजी साजरी होणार आहे.त्यामुळे  शिराळा येथे नागपंचमी यात्रा मोठया प्रमाणात भरविली जाते. यात्रेस जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील विविध भागातून मोठया प्रमाणावर भाविक यात्रेकरु मोठया संख्येने येतात. त्यामुळे  नागपंचमी दिवशी शिराळा येथीत वाहतूक सुरळीत रहावी . गर्दीत वाहन घूसून नागरीकांचे जीवीतास धोका पोहचू नये यासाठी  सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.  ही वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पेठनाका येथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील. शिराळाकडून राष्ट्रीय महामार्ग ४ कडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी- कार्वे ढगेवाडी फाटा- ऐतवडे बुद्रुक फाटा-लाडेगाव-वशी येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्र ४ कडे जातील. शिराळा बायपास येथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.सदरचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments