शिराळा,ता.२९:करमाळे (ता.शिराळा) येथील सरपंच व ग्रामस्थांनी मुंबई येथे तिळगंगा नदी पुनरुज्जीवन संदर्भात पाणी फाउंडेशन चे संस्थापक अभिनेते अमीर खान यांची भेट घेतली. त्यावेळी लवकरच करमाळे गावाला भेट देण्याचे आश्वासन अभिनेते आमिर खान यांनी दिले असल्याची माहिती सरपंच सचिन पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,तिळगंगा नदी पुनरुज्जीवनसाठी आता पाणी फाउंडेशन व ग्रामप्रकाश संस्था यांचे सहभागातून या कामाला गती येणार आहे. लवकरच स्वतः आमिर खान तिळगंगा नदीच्या खोऱ्याची पाहणी करण्यासाठी करमाळे गावाला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. सत्यजित भटकळ व अमीर खान यांची कन्या व अगत्सु फाउंडेशनच्या अहिरा खान यांचे सोबत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अमीर खान यांनी पाणी फाउंडेशन व ग्रामप्रकाश संस्था मिळून सोबत काम करतील असे सांगितले.ग्रामधन (ग्रामकोष) संकल्पना हि प्रदीप गारोळे संचालक, पाणलोट विकास व व्यवस्थापन केंद्र, यशदा, पुणे यांची असून त्याबद्दल ग्रामप्रकाश संस्थाचे सचिव प्रकाश पाटील यांनी विस्तृतपणे माहिती दिली. करमाळे गावाने ग्रामधन संकल्पनेचा महाराष्ट्रातील पहिला ग्रामसभा ठराव केला आहे.दरम्यान महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सहसंचालक प्रियांका सकटे यांची भेट घेतली. त्यांनी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेल्या करमाळे गावासह इतर गावांचा सध्य परिस्थिती संबंधित विभागातील अधिकाऱ्याकडून माहिती घेतली व आराखडा करणेबाबतच्या सूचना दिल्या आहेत.करमाळे गाव हे महावितरणच्या भगीरथ योजनेपासून वंचित असल्यामुळे मुंबई येथे महावितरण व्यवस्थापक अशोक साळुंखे यांची भेट घेतली. त्यांनी संबंधित विभागांना सूचना करून प्रथम प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्यात येईल असे सांगितले.
यावेळी भारतीय विद्यापीठ पुणे चे प्रकाश संदे, जल व्यवस्थापक तीळगंगा नदी व जलनायक यशदा पुणे चे प्रकाश पाटील, ग्रामसेवक राजेश सूर्यवंशी, विशाल पवार, राकेश माने उपस्थित होते.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments