मिरुखेवाडीला सॅटेलाईट फोन सुविधा | Satellite phone facility to Mirukhewadi
शिराळा ,ता.२३ : मिरुखेवाडी ता. शिराळा येथे भूस्खलनचा संभाव्य धोका असल्याने येथील लोकांच्यासाठी तातडीची संपर्क यंत्रणा म्हणून सॅटेलाईट फोन देण्यात आले असून त्याचे प्रशिक्षण तहसीलदार शामला खोत पाटील यांनी ग्रामस्थ व ग्रामसेवक यांना दिले आहे.
मिरुखेवाडीला सॅटेलाईट फोन सुविधा | Satellite phone facility to Mirukhewadi
शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून अतिवृष्टी सुरु आहे. या परिसरात भूस्खलनाचा संभाव्य धोका असणाऱ्या शिराळा पश्चिम भागातील वाड्यावस्त्यांची पाहणी दोन दिवसा पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत, माजी आमदार शिवाजीराव नाईक,सत्यजित देशमुख,रणधीर नाईक, हणमंतराव पाटील, विराज नाईक ,भूषण नाईक यांनी केली होती. त्यावेळी मिरुखेवाडी,कोकणेवाडी,भाष्टेवस्ती,धामणकरवस्ती गावाला भूस्खलनचा संभाव्य धोका असल्याने प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतली जाईल. बचाव साहित्य उपलब्ध करू देऊ. सॅटॅलाइट फोनची व्यवस्था केली जाईल.पावसाळ्यामध्ये होणारी अडचण लक्षात घेऊन तात्पुरत्या स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दिले आहे . काल पासून या परिसारत पावसाचा जोर वाढल्याने आज दुपारी तहसीलदार शामला खोत पाटील यांनी मिरुखेवाडी येथे भेट देऊन पाहणी केली. लोकांच्यासाठी तातडीची संपर्क यंत्रणा म्हणून सॅटेलाईट फोन देवून त्यांना प्रात्यक्षिक दाखविले. लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी मणदूर ग्रामसेवक एम.एन.पाटील, आरळा ग्रामसेवक अमोल बाबर, मंडल अधिकारी विठ्ठल पाटील ,प्रकाश धामणकर, राम माने , बाळू मिरुखे, उत्तम कंदारे, विठ्ठल मिरुखे, तलाठी विकास गुरव , ग्रामस्थ उपस्थित होते.
मिरुखेवाडीला सॅटेलाईट फोन सुविधा | Satellite phone facility to Mirukhewadi
पावसाचा जोर आणखी वाढल्यास येथील नागरिकांना करुंगली येथील मंगल कार्यालयात स्थलांतरीत करण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे. सध्या आठ कुटुंबांची येथीलच जिल्हा परिषद शाळेत झोपण्याची व्य्स्वस्था केली आहे. तातडीची संपर्क यंत्रणा म्हणून सॅटेलाईट फोन देण्यात आला आहे.शामला खोत तहसीलदार शिराळा
मिरुखेवाडीला सॅटेलाईट फोन सुविधा | Satellite phone facility to Mirukhewadi
0 Comments