समाज माध्यम हे मोठे व्यसन Social media is a big addiction
शिराळा,ता.२८: सध्या समाज माध्यम हे मोठे व्यसन होऊ लागले आहे. त्यामुळे अनोळखी संदेशाला उत्तर व आपली माहिती देऊ नका. आपली फसवणूक व बदनामी होऊ शकते. विध्यार्थांनी मोबाईल वापर टाळावा. कायदा सर्वांना समान आहे. बाल विवाह टाळा असे प्रतिपादन शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी केले.
समाज माध्यम हे मोठे व्यसन Social media is a big addiction
सागाव ता.शिराळा येथे वारणा विद्यालय व जुनिअर कॉलेज आणि जागृत ग्राहकराजा संघटनेच्यावतीने विदयार्थी,पालक समुपदेशन, सत्कार समारंभ व तरुण वर्गामधील वाढती व्यसनाधिनता या विषयी आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते.
समाज माध्यम हे मोठे व्यसन Social media is a big addiction
यावेळी साधना पाटील म्हणाल्या, महिला व मुलींनी अन्याया विरोधात लढण्यासाठी सक्षम होऊन त्यास विरोध करण्याची धमक आपल्यात निर्माण करायला हवी. त्यासाठी ताकद मनगटात पाहिजेच असे नाही. मात्र तशी बुद्धी असली पाहिजे. मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. व्यसनाधीनतेला वय राहिलेले नाही.त्यामुळे पालकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. अनंत खोचरे यांनी ग्राहक संरक्षण कायदा याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
जागृत ग्राहकराजा संघटना राज्य प्रांत कार्यकारिणी मध्ये अनंत खोचरे,विद्याताई पाटील,साधना पाटील यांची नियुक्ती झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
समाज माध्यम हे मोठे व्यसन Social media is a big addiction
स्वागत व प्रास्ताविक विद्याताई पाटील यांनी तर सूत्रसंचलन व्ही.डी.पाटील यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक अरुण पाटील, हंबीरराव देशमुख,,डॉ.जयश्री पाटील, उज्वला देशमुख, शकुंतला पाटील, के. वाय. पाटील, अरविंद सदावर्ते,पोलीस पाटील रुपाली तिके, संगीता पाटील, सुनंदा दिवे, रोहिणी जाधव, एस.डी.जमदाडे,जितेंद्र गायकवाड, भरत नलवडे, शिवाजीराव चौगुले उपस्थित होते.आभार सचिन इंगवले यांनी मानले.
समाज माध्यम हे मोठे व्यसन Social media is a big addiction
0 Comments