BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एस.टी .अपघात २४ जखमी :ST Accident 24 Injured :

एस.टी .अपघात २४ जखमी :ST Accident 24 Injured :



 शिराळा,ता.२३:  बिऊर ता .शिराळा येथील नाथ फाटा  चौकात येथे बाह्यवळण रस्त्यावर  पावसामुळे समोरचे न दिसल्याने शिराळा आगाराच्या दोन एस.टी.बस ची वळणावर सामोरा समोर धडक होऊन दोन्ही बस मधील २४  प्रवाशी जखमी झाले आहेत. यामध्ये शिराळा,वाळवा,शाहुवाडी,तासगाव  तालुक्यातील प्रवाशांचा समावेश आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमी रुग्णांची उपजिल्हा रुग्णालयात जाऊन आमदार मानसिंगराव नाईक यांनी विचारपूस करून योग्य ते उपचार करण्याची सूचना डॉक्टरांना दिल्या.

एस.टी .अपघात २४ जखमी :ST Accident 24 Injured :

 याबाबत चालक संजय बाबुराव  यादव रा. बांबवडे ता,शाहुवाडी यांनी शिराळा पोलिसात वर्दी  दिली आहे. ही घटना  दुपारी अडीच वाजण्याचा सुमारास घडली. याबाबत पोलीसातून समजलेली माहिती अशी,  शिराळा आगाराची बस इस्लामपूरहुन बांबवडे(गाडी क्रमांक एम एच ४० एन ९२७९)व  बांबवडेहुन इस्लामपूरकडे (गाडी क्रमांक एम एच १४ बी टी ३३६) निघाली होती. पाऊस सुरु असल्याने समोरचे न दिसल्याने  या दोन्ही गाड्यांची  बिऊर येथील नाथ फाटा चौकात बाह्यवळण रस्त्याच्या वळणावर समोरासमोर धडक झाली. या धडकेने बेसावद असणारे प्रवाशी  पुढील बाकावर आदळल्याने त्यांच्या तोंड ,दात ,गळा,डोके , हनुवटी,कपाळ  यास मार बसून जखमी झाले. यांना तातडीने १०८ रुग्णवाहिका मधून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर  डॉ.अनिरुद्ध काकडे ,डॉ. योगिता माने ,डॉ.अश्विनी पुरी,डॉ.आनंदराव पाटील,कर्मचारी यांनी  तातडीने उपचार केले. जखमींना एक हजार व पाचशे रुपये तातडीची मदत एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच आमदार मानसिंगराव नाईक यांनी घटनास्थळी व शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करून त्यांना धीर दिला.रुग्णांना  अधिक उपचाराची आवश्यकता  असल्यास त्यांना  सांगलीला पाठवावे, अशा सूचना केल्या.  पुढील  तपास पोलीस हवालदार बाजीराव भोसले   करीत आहेत.

एस.टी .अपघात २४ जखमी :ST Accident 24 Injured :

अपघातातील जखमी पुढीलप्रमाणे - जालिंदर पांडुरंग शिंदे (वय ३९ रा.कांदे),कल्पना अरुण घोलप (वय  ४० रा इस्लामपूर),येसूबाई आप्पासाहेब सोनवणे (वय७० रा.आष्टा ),दर्शना नामदेव थोरात ( वय १६ रा.खरातवाडी) ,रेखा प्रकाश पाटील (वय ४५ रा.इस्लामपूर),अक्काताई जगन्नाथ देसाई (वय७५ रा.भाटशिरगाव ),शारदा पांडुरंग जाधव ( वय ४५ , रा.माणगाव),सविता रामचंद्र घाडगे (वय ४५ , रा.माणगाव),सजाबाई विश्वास काळोखे (वय ७५  रा.ऐतवडे बुद्रुक ),इंदूबाई काकासाहेब मोरे ( वय ७०  रा.सागाव),मालन पांडुरंग सुतार (वय ५५ , रा सागाव),पार्वती रंगराव पाटील (वय७५  रा. सागाव),शोभा भीमराव कुंभार (वय ५५ रा.कांदे),दत्तात्रय दिनकर गुरव (वय ५२ रा.पुणे),वसंत दत्तू माने ( वय ७७  बिऊर ),दादासो  दत्तू सातपुते (वय ७०रा. नाटोली),जालिंदर पांडुरंग शिंदे (वय ३९ , रा. कांदे),उज्वला सुभाष पाटील (वय ३८  रा.तडवळे),सानिका सुभाष पाटील (वय २२ रा.तडवळे),पांडुरंग चंद्रु पाटील ( वय ७६  रा.नाटोली),प्रणाली सुरेश गायकवाड (वय २०  , रा.कापशी ),साहिल अरुण घोलप ( वय १९ रा.इस्लामपूर बोरगाव ), शारदा पांडुरंग यादव ( वय ५६  रा. सुखवाडी  भिलवडी ), अक्षरा अरुण घोलप ( वय १२  रा.इस्लामपूर बोरगाव )




























Post a Comment

0 Comments