BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पारधी घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार -प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन | Pardhi Gharkul Schemes will be effectively implemented - Provincial Magistrate Srinivasa Arjun

पारधी घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार -प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन | Pardhi Gharkul Schemes will be effectively implemented - Provincial Magistrate Srinivasa Arjun

शिराळा,ता.२७:आदिवासी, पारधी समाजाच्या घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केले.

पारधी घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार -प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन | Pardhi Gharkul Schemes will be effectively implemented - Provincial Magistrate Srinivasa Arjun

 पारधी समाजाच्या पुनर्वसनाबाबत शिराळा तहसील कार्यालयामध्ये आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी तहसीलदार शामल खोत पाटील, नायब तहसीलदार हसन मुलाणी,गटविकास अधिकारी संतोष राऊत, दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे  प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे उपस्थित होते.पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने १७  जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर 'पाल ठोक' आंदोलन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने  शिराळा तालुक्यातील पुनर्वसनाबाबत ही बैठक पार पडली.   बैठकीच्या सुरवातीला पारधी समाजाच्या विविध समस्या व प्रश्न मांडण्यात आले. तत्कालीन तहसीलदार गणेश शिंदे यांनी लेखी आदेश देऊनही काही गावातील लोकांनी पारधी कुटुंबाना हाकलून दिले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा तसेच पारधी समाजासाठी ज्या योजना आहेत त्याची ठोस अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सुधाकर वायदंडे यांनी केली. गावनिहाय आढावा घेवून  घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पारधी आवास योजना,शबरी आदिवासी घरकुल योजना,पंडित दीनदयाळ उपाध्ये घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करणार आहे . आठ दिवसात शिधापत्रिका व जातींचे दाखले देणार असल्याचे प्रांताधिकारी अर्जुन  यांनी सांगितले. 

पारधी घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार -प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन | Pardhi Gharkul Schemes will be effectively implemented - Provincial Magistrate Srinivasa Arjun

बैठकीस दलित महासंघाचे दिनकर नांगरे, गंगाराम तांबीरे, आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे, टारझन पवार, राकेश काळे,दिकल पवार,चार्जिंग पवार,रोशना पवार,गुलछडी काळे,जागृती पवार,लांजी काळे,अश्विनी पवार  उपस्थित होते.

पारधी घरकुल योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार -प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन | Pardhi Gharkul Schemes will be effectively implemented - Provincial Magistrate Srinivasa Arjun

Post a Comment

0 Comments