सासूवर जावयाचा ब्लेडने हल्ला | Mother-in-law attacked with a blade
शिराळा ,ता.११: येथील महिलेवर माझी बायको कोठे गेली ते मला सांग म्हणत जावयाने ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना घडली . जया रमेश गायकवाड ( वय ४५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. संशयित आरोपी जावई प्रवीण महिपती आढाव ( रा.अंत्री बुद्रुक , ता.शिराळा) या वार करून फरार झाला आहे.
सासूवर जावयाचा ब्लेडने हल्ला | Mother-in-law attacked with a blade
याबाबत जखमी जया गायकवाड यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना आज मंगळवार (ता.११) रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली.याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी की , जया गायकवाड ह्या शिराळा येथे भाडोत्री म्हणून एका घरामध्ये नातू विजय सह रहात आहेत. जयाची मोठी मुलगी स्वप्ना प्रवीण आढाव ही पती व दोन मुलीसह अंत्री बुद्रुक येथे राहण्यास होती. परंतु स्वप्ना आपल्या दोन मुलींना घेऊन घरात कोणास न सांगता निघून गेली आहे. याबाबत प्रवीणने सासू जया यांना स्वप्ना मुलीन सह घरातून गेल्याची माहिती आठ दिवसांपूर्वी दिली होती. सर्वांनी त्या तिघींचा शोध घेतला असता त्या आढळून आल्या नाहीत.
सासूवर जावयाचा ब्लेडने हल्ला | Mother-in-law attacked with a blade
पत्नी गेल्याचा राग मनात धरून आज शनिवारी सकाळी ११ च्या दरम्यान जया व तिचा नातू हे घरात असताना प्रवीण ने तेथे येऊन माझी बायको कोठे गेली ? ते मला सांग असे म्हणून सासू जया यांच्याबरोबर भांडण काढले. त्यांना शिवीगाळ केली .त्यावेळी मला स्वप्ना चा फोन आला किंवा तिची माहिती मिळाली की मी तुम्हाला सांगेन असे जया म्हणताच तूच माझ्या घरचा नाश केला असे म्हणून प्रवीणने त्याच्या खिशातील ब्लेड काढून जयाच्या दोन्ही हातावर व इतर ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. त्यावेळी जयाने आरडाओरडा केला असता शेजारी लोक जमा झाल्याने प्रवीणने तिथून पळ काढला. जखमी जयावर शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील तपास पोलीस हवालदार सुनील पेटकर करत आहेत.
सासूवर जावयाचा ब्लेडने हल्ला | Mother-in-law attacked with a blade
0 Comments