BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोरणा धरण भरले | Morna Dam was filled

मोरणा धरण भरले | Morna Dam was filled



शिराळा,ता.२८:येथील मोरणा धरण १०० टक्के धरण भरले आहे.नदीचे पाणी पूजन व ओटी भरणी इस्लामपूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष पाटील, शाखा अभियंता एस.के.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सांडव्यातून पाणी बाहेर पडल्याने मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. 

मोरणा धरण भरले | Morna Dam was filled 

 चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून धरण ८५.२५  टक्के भरले असून ११७०९  क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणात २९.३३  टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सायंकाळी  चार वाजता  धरणाच्या  पाण्याची पातळी  ६२१.८०  मीटर आहे. पाणीसाठा ८३०.४६४  दलघमी आहे.  शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत आठ तासात ७  मी .मी .अशा एकूण ११०५  मी. मी.पावसाची नोंद झाली आहे.कोकरूड ते रेठरे, मांगले -सावर्डे, शिराळे खुर्द- माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.

मोरणा धरण भरले | Morna Dam was filled 

चौकट- शिराळा तालुक्यात मंडल निहाय मी .मी. मध्ये पडलेला पाऊस 

कोकरूड -३२ ,शिराळा ३४.८ , शिरशी २४  ,मांगले-३४.८  ,सागाव -२९.८  ,चरण -३५.५    

.इतर पर्जन्यमापक यंत्रावर झालेली नोंद 

निवळे ७७ (२४४१)

चांदोली ४३ (१०९८)

 धनगरवाडा   ४१(१४१५)

पाथरपुंज ११२  (२५८७)

मोरणा धरण भरले | Morna Dam was filled 





























Post a Comment

0 Comments