BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्थलांतरासाठी पाच पथके तयार | Five teams ready for migration



स्थलांतरासाठी पाच पथके तयार | Five teams ready for migration

 शिराळा,ता.२५: शिराळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे डोंगर माथ्यावरील नागरी वस्तीनजीक भुस्खलनाचा संभाव्य  धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणची आवश्यकता भासल्यास  प्रशासनाने जय्यत तयारी केली असून  त्यांना  अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा देण्यासाठी  ५ पथके तयार करण्यात आली आहेत.

स्थलांतरासाठी पाच पथके तयार | Five teams ready for migration

शिराळा तालुक्यातील मिरुखेवाडी व कोकणेवाडी येथील भूस्खलनचा धोका असणाऱ्या गावांच्या भूसंपादनाची प्रक्रिया ९ ऑगस्ट २०२१ ला पासून सुरु झाली आहे.अतिवृष्टीने भुस्खलन झाल्याने  जमिन खचलेली आहे. त्यामुळे लोकांनी येथे वास्तव्य करणे धोकादायक आहे.त्यामुळे लोकांनी आपल्या कुटुंबां सह पशुधनासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. तशी व्यवस्था नसल्यास  प्रशासनाला  कळवावे . त्यामुळे त्यांची  सुरक्षिक ठिकाणी स्थलांतरीत करण्याची  सोयी केली जाईल . अशा नोटीसा प्रशासनाच्या वतीने येथील नागरिकांना ६ जून २०२३ ला  दिलेल्या  आहेत.  जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी २० जुलै रोजी  मिरुखेवाडी व कोकणेवाडी तसचे खुंंदलापूर येथे  भेट दिली होती. त्यावेळी पावसाची शक्तया जादा प्रमाणामध्ये असलेने पुन्हा भुस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही .तरी सर्वांनी सतर्क राहून प्रशासनाला  तात्काळ कळवावे असे आवाहन  केले होते. नैसर्गिक आपत्ती कालावधीमध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे आपले मुख्यालयाचे ठिकाणी उपस्थित राहणेच्या सुचना दिलेल्या आहेत.मिरुखेवाडी येथे मोबाईल रेंज कमी असलेने तेथील नागरिकांशी संपर्क करणेसाठी  सॅटेलाइट मोबाईल फोन  देण्यात आला आहे. त्यावरून लोक सतत प्रशासनाशी संपर्कात राहतील.सार्वजनिक बांधकाम व  पंचायत समिती बांधकाम विभाग यांना संततधार सुरु असलेल्या पावसामुळे डोंगर भागातून रस्त्यावर वाहन आलेल्या दगड, माती व इतर अडथळे दुर करणेबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत. विद्युत वितरण अधिकारी यांना विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणेबाबतच्या सुचना दिलेल्या आहेत. एन.डी.आर.एफ च्या माध्यमातून १८ सदस्यांनी येथील नागरिकांना एक दिवसाचे प्रशिक्षण दिले आहे. गरज भासल्यास करुंगली येथील  लक्ष्मी मंगल कार्यालय लोकांना  स्थलांतरीत करणेसाठी प्रशासन सज्ज आहे. 

स्थलांतरासाठी पाच पथके तयार | Five teams ready for migration


  संभाव्य स्थलांतरीत कुटुंबे

 कोकणेवाडी -४७ 

भाष्टेवाडी -१२ 

धामणकरवस्ती -७ 

 मिरुखेवाडी-५३

Post a Comment

0 Comments