BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एजंट न बनता चांगला कार्यकर्ता व मार्गदर्शक बनून ग्राहक हक्कासाठी लढा | Fight for consumer rights by being a good worker and guide without becoming an agent

शिराळा,ता. २ :आपल्या न्याय हक्कासाठी लिहिते व्हा. प्रशिक्षित होऊन एजंट न  बनता  चांगला कार्यकर्ता व मार्गदर्शक बनून  ग्राहक हक्कासाठी लढा असे प्रतिपादन  जागरूक ग्राहक राजा संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप फडके यांनी केले. 

एजंट न  बनता  चांगला कार्यकर्ता व मार्गदर्शक बनून  ग्राहक हक्कासाठी लढा | Fight for consumer rights by being a good worker and guide without becoming an agent 

शिराळा पंचायत समिती सभागृह  ग्राहक जागृती प्रबोधन कार्यशाळा व नूतन कार्यकारणी निवड पत्र व ओळखपत्र वाटप प्रसंगी  बोलत होते. राज्य संघटक दिलीप पाटील म्हणाले, सध्या काळा प्रमाणे बदल स्वीकारण्याची गरज आहे. संख्ये  पेक्षा एका विचाराने एकत्रित येणारे लोक महत्वाचे आहेत. कोणाचे नुकसान न करता त्यांची विचार सरणी बदलण्याचे काम करा. मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करू नये.

एजंट न  बनता  चांगला कार्यकर्ता व मार्गदर्शक बनून  ग्राहक हक्कासाठी लढा | Fight for consumer rights by being a good worker and guide without becoming an agent 

प्राजक्ता पाध्ये म्हणाल्या, महिलांनी हक्क घेतले पण कर्तव्य विसरत आहेत.प्रत्येक महिलेला आदराने मान मिळाला पाहिजे. मुलांच्यावर माणूस म्हणून जगण्याचे संस्कार लहानपणी व्हावेत.

एजंट न  बनता  चांगला कार्यकर्ता व मार्गदर्शक बनून  ग्राहक हक्कासाठी लढा | Fight for consumer rights by being a good worker and guide without becoming an agent 

 कोल्हापूर विभाग संघटक मिलिंद सुतार म्हणाले,मनोरंजना मधील थोडा वेळ वाचन,लेखन,व संपर्कासाठी द्या. अनेक गोष्टींचे निरीक्षण करण्याची क्षमता असावी. काम थोडे करा पण त्यात सातत्य हवे.ग्राहकाला लढायला शिकवा.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे अध्ययन विभागचे वसंत शिंघण म्हणाले,माहित असणारा कायदा वापरण्याचे धाडस करा. प्रारंभी नूतन कार्यकरणींच्या नियुक्ती व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

एजंट न  बनता  चांगला कार्यकर्ता व मार्गदर्शक बनून  ग्राहक हक्कासाठी लढा | Fight for consumer rights by being a good worker and guide without becoming an agent 

यावेळी साधना पाटील,अनंत खोचरे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक हंबीरराव देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन मनोज मस्के यांनी तर आभार शिवाजीराव चौगुले यांनी मानले. 

एजंट न  बनता  चांगला कार्यकर्ता व मार्गदर्शक बनून  ग्राहक हक्कासाठी लढा | Fight for consumer rights by being a good worker and guide without becoming an agent 

Post a Comment

0 Comments