BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

#फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघ अध्यक्ष निवड | #Fattesingrao Cooperative Milk Union President Election



 #फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघ अध्यक्ष निवड | #Fattesingrao Cooperative Milk Union President Election

 शिराळा ,ता.७: येथील फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी अमरसिंह नाईक व उपाध्यक्षपदी प्रकाश धस यांची निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.डी. लाड यांनी काम पाहीले.



 #फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघ अध्यक्ष निवड | #Fattesingrao Cooperative Milk Union President Election

यावेळी अमरसिंह नाईक म्हणाले, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक  यांनी  शिराळा तालुक्याच्या शेतकरी दूध उत्पादकांना व्यावसायिक चालना देत तालुक्याच्या धवल क्रांतीस गती देण्याची प्रमुख भूमिका होती. तीच  भूमिका संघाचा  अध्यक्ष या नात्याने पूर्ण करण्याची जबाबदारी सातत्याने मला देत असल्या बद्दल आमदार मानसिंगराव नाईक व संचालक मंडळ, शेतकरी दूध उत्पादक, संघाचे सभासद, दूध पूरवठा करणा-या सर्व दूध संस्था व केंद्र त्याच बरोबर संघाचे नाव लौकीक वाढावे यासाठी सहकार्य करणा-या संघ कर्मचारी यांचे  आभार मानतो. संघाच्या यशस्वी वाटचालीचा चढता आलेख हा वाढवत नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न माझ्याकडून होतच राहील. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्याच्या दूध व्यवसायातील चढ उतार, नफा तोटा, नैसर्गिक येणा-या अडचणी यावर मात करत प्रामुख्याने या संघास दूध पुरवठा करणा-या सर्वांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल. मुंबई येथे लवकरच सुरू होणारा दूध संघ हा या संघाच्या यशाचे द्योतक आहेच .त्याच बरोबर मुंबई येथील दूध संघामुळे विश्वास उद्योग समुहाच्या कक्षा राज्य पातळीवर रूंदावत आहेत. याचे श्रेय आमदार मानसिंगराव नाईक आणि विश्वास उद्योग समूहावरती व दूध संघावरती विश्वास ठेवणा-या व सहकार्य करणा-या सर्व हितचिंतकांचे आहे.

 #फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघ अध्यक्ष निवड | #Fattesingrao Cooperative Milk Union President Election

यावेळी भूषण नाईक, संघाचे संचालक संजय पाटील, श्रीरंग भोसले, बबन पाटील, अनिल पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी यमगर, शिवाजी लाड ,तुकाराम सावंत, गणेश पाटील , माणिक दशवंत, शरद पाटील, संजय शिंदे, नामदेव पडवळ, लक्ष्मण पाटील, प्रणव पाटील, मंगला पाटील,रुपाली पाटील, मनिषा यादव, व्यवस्थापक दिनकर नायकवडी व कार्यकारी संचालक रविंद यादव उपस्थित होते.

 #फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघ अध्यक्ष निवड | #Fattesingrao Cooperative Milk Union President Election



























Post a Comment

0 Comments