BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आषाढी निमित्त हजारो भाविकांनी घेतले गोरक्षनाथांचे दर्शन | Thousands of devotees visited Gorakshanath on the occasion of Ashadhi

 शिराळा,ता.२९:आषाढी एकादशी निमित्त शिराळा येथील प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या महायोगी गुरु गोरक्षनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच भक्तांनी गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

आषाढी निमित्त हजारो भाविकांनी घेतले गोरक्षनाथांचे दर्शन | Thousands of devotees visited Gorakshanath on the occasion of Ashadhi

.       आषाढी एकादशी दिवशी प्रत्यक्ष विठ्ठल येथे स्नानासाठी येतात व भक्तांना दर्शन देतात अशी अख्यायिका आहे. त्यामुळे  ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येते नाही ते भाविक सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातून येथे शिराळ्यात गोरक्षनाच्या दर्शनाला येतात. 

आषाढी निमित्त हजारो भाविकांनी घेतले गोरक्षनाथांचे दर्शन | Thousands of devotees visited Gorakshanath on the occasion of Ashadhi

      गोरक्षनाथ मठातर्फे प्रतिवर्षी पंढरपूरला दिंडी जाते. नाथ मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटे चे आरती. त्यानंतर मठाधीपाती पीर पारसनाथ महाराज,आनंदनाथ महाराज,खासदार संजय पाटील व परिवार यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी बाळासो पाटील, बापुसो पाटील यांच्या उपस्थितीत भाविकांना खिचडी,लस्सी वाटप आमदार विनय कोरे यांच्या हस्ते वाटप झाले. यावेळी शिराळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

आषाढी निमित्त हजारो भाविकांनी घेतले गोरक्षनाथांचे दर्शन | Thousands of devotees visited Gorakshanath on the occasion of Ashadhi

सांगली,सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वारकरी दिंड्या जयजय रामकृष्ण हरी व टाळ मृदूंगाच्या तालात अंगावर पावसाच्या हलक्या सरी झेलत  दाखल झाल्या. येणाऱ्या भाविकांना शिराळा मुस्लिम समाज्याच्यावतीने,फराळ व पाणी बाटल्या वाटप करण्यात आले.

आषाढी निमित्त हजारो भाविकांनी घेतले गोरक्षनाथांचे दर्शन | Thousands of devotees visited Gorakshanath on the occasion of Ashadhi

Post a Comment

0 Comments