BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सलग दोन दिवस होणार पाणी पुरवठा |Water will be supplied for two consecutive days

सलग दोन दिवस होणार पाणी पुरवठा |Water will be supplied for two consecutive days



 शिराळा,ता.२८:तालुक्यात अद्याप सुरळीत पाऊस सुरू झाला नसल्याने मोरणा धरणात कमी पाणी साठा आहे.आषाढी एकादशी आणि बकरी ईदअसल्यामुळे  उद्या गुरुवार ता.२९ व परवा शुक्रवारी ता.३० रोजी सलग दोन दिवस शिराळा शहरात पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती शिराळ नगरपंचायत चे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील यांनी दिली.

सलग दोन दिवस होणार पाणी पुरवठा |Water will be supplied for two consecutive days

         यावेळी योगेश पाटील म्हणाले, पावसाने पाठ फिरवल्याने गेले तीन आठवड्या पासून शिराळा शहराला एक दिवस आड कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अद्याप पावसाला चांगली सुरुवात झाली नसल्याने पाणीटंचाईचे संकट अजूनही कायम आहे. तरी ही आषाढी एकादस व बकरी ईद असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून एक दिवस आड ऐवजी उद्या गुरुवार व परवा शुक्रवारी सलग दोन दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी पाणीपुरवठयाच्या वेळेत थोडी कपात  करणे आवश्यक आहे. तरी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपंचायतीस सहकार्य करावे.

सलग दोन दिवस होणार पाणी पुरवठा |Water will be supplied for two consecutive days


























Post a Comment

0 Comments