आषाढी एकादशी निमित्ताने मुस्लीम बांधवांनी घेतला हा निर्णय | This decision was taken by Muslim brothers on the occasion of Ashadhi Ekadashi
आषाढी एकादशी निमित्ताने मुस्लीम बांधवांनी घेतला हा निर्णय | This decision was taken by Muslim brothers on the occasion of Ashadhi Ekadashi
शिराळा,ता.२५ : शिराळा शहर हे हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. तब्बल बारा वर्षांने आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने शिराळा शहरातील मुस्लिम बांधव आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी करणार नसल्याचे प्रतिपादन शिराळा मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष दस्तगीर आत्तार यांनी केले.
आषाढी एकादशी निमित्ताने मुस्लीम बांधवांनी घेतला हा निर्णय | This decision was taken by Muslim brothers on the occasion of Ashadhi Ekadashi
शिराळा पोलिस ठाण्यात शहर मुस्लिम समाज संघटनेच्या बैठकीत बोलत होते.यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सचिव ॲड. बाबालाल मुजावर, उपाध्यक्ष मेहबूब मुल्ला , मुस्लिम ओबीसी संघाचे अध्यक्ष खलिल मोमिन, सिकंदर पठाण, खिदमत ग्रुपचे अध्यक्ष फिरोज मुजावर, रफिक आत्तार ,शफिशेठ मुल्ला, फिरोज मुल्ला, फारुख मुल्ला, बंदे नवाज हाफीजी, हमीद मुल्ला,अस्लम नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
आषाढी एकादशी निमित्ताने मुस्लीम बांधवांनी घेतला हा निर्णय | This decision was taken by Muslim brothers on the occasion of Ashadhi Ekadashi
यावेळी आत्तार म्हणाले,आषाढी एकादशीला हजारो भाविक गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी शिराळ्यात येतात. जे भाविक एकादशीला पंढरपूरला जाऊ शकत नाहीत. ते येथील गोरक्षनाथ महाराजांचे दर्शन घेतात. शिराळा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. त्यामुळे आम्ही शिराळा शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी गुरुवारी ईदची नमाज पठण करायचं परंतु बकऱ्यांची कुर्बानी त्या दिवशी न करता दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) करावयाची असा निर्णय आम्ही शिराळा मुस्लिम समाजाच्या वतीने एकमुखी घेतला आहे. सदर निर्णय हा सांगली जिल्ह्यात पहीला निर्णय आहे.शिराळा मुस्लिम समाज्याच्या वतीने एकादशी दिवशी गोरक्षनाथ महाराजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात येणार आहेत.
आषाढी एकादशी निमित्ताने मुस्लीम बांधवांनी घेतला हा निर्णय | This decision was taken by Muslim brothers on the occasion of Ashadhi Ekadashi
ॲड बाबालाल मुजावर म्हणाले, शिराळा शहरातील नागपंचमी असो की गोरक्षनाथ यात्रा कोणताही सण आम्ही हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने साजरा करतो. हाच एकोपा जपण्यासाठी आषाढी एकादशी दिवशी बकऱ्यांची कुर्बानी न करण्याचा निर्णय शिराळा शहर मुस्लिम समाज्याने घेतला आहे.
आषाढी एकादशी निमित्ताने मुस्लीम बांधवांनी घेतला हा निर्णय | This decision was taken by Muslim brothers on the occasion of Ashadhi Ekadashi
पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले, आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी न करता फक्त नमाज पठण करायचं व ईद दुसऱ्या दिवशी साजरी करायची हा निर्णय अतिशय उल्लेखनीय आहे. शिराळा येथील मुस्लिम समाज बांधवांनी हा निर्णय घेऊन जिल्ह्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.या बैठकीस हाजी दिलावर मोमीन, डॉ.अजीम मुल्ला वसिम मोमीन, सरफराज मुल्ला, हारुण शेख उपस्थित होते.
आषाढी एकादशी निमित्ताने मुस्लीम बांधवांनी घेतला हा निर्णय | This decision was taken by Muslim brothers on the occasion of Ashadhi Ekadashi
0 Comments