BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाले व गटारी साफसफाई करण्यास सुरुवात | Start cleaning the drains and gutters

 नाले व गटारी साफसफाई करण्यास सुरुवात | Start cleaning the drains and गुट्टेरेस



शिराळा,ता.२८: शिराळा तालुक्यात पावसाने सुरुवात केल्याने गावागावात आता नाले व गटारी साफसफाई करण्याची कामे गतिमान झाली आहेत. गावात कोणत्याही प्रकारची साथ उद्भवणार नाही याची दक्षता आरोग्य विभाग बरोबर आता ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना घ्यावी लागणार आहे. डासांचे प्रमाण वाढू नये म्हणून औषध फवारणी करावी लागणार आहे.   

 नाले व गटारी साफसफाई करण्यास सुरुवात | Start cleaning the drains and gutters

चरण (ता शिराळा) येथे ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी गावातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरील गटारी साफ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याने ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गावातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवरील गटारी तुंबल्याने अनेक ठिकाणी गटारी पाणी गटारी मध्ये तुंबून डासांचे प्रमाण वाढले होते.याबबत संबंधित ग्रामपंचायतीने दखल घेऊन गावात गेल्या आठ दिवसांपासून जेसीबीच्या सहाय्याने गटारी साफ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. माजी उपसभापती बी.के.नायकवडी व चेअरमन रामचंद्र नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सोनाली नायकवडी, उपसरपंच हमीद नायकवडी, ग्रामसेवक पी.आर.चिंदे, सर्जेराव शिंदे व सर्व सदस्य स्वच्छतेबाबत जनजागृती करताना दिसून येत आहे आहेत.

 नाले व गटारी साफसफाई करण्यास सुरुवात | Start cleaning the drains and gutters



























Post a Comment

0 Comments