BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वरातीवेळी हवेत गोळीबार करताना एक जखमी | One injured while firing in the air during Varati



वरातीवेळी हवेत गोळीबार करताना एक जखमी | One injured while firing in the air during Varati

शिराळा,ता.२९: भाटशिरगाव (ता.शिराळा) येथे लग्नाच्या वरातीवेळी नाचत असताना आनंदाच्या भरात रिव्हॉल्वर ने  हवेत गोळीबार करताना त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ऋतिक  दिलीप इंगळे ( वय २३ , रा.भाटशिरगाव ) या युवकाच्या डाव्या  दंडाच्या वरील बाजूने  एक गोळी आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी रिव्हॉल्व्हर मालक संजय सखाराम देसाई ( वय ५२) ,व हवेत गोळीबार करणारा ओमकार भगवान देसाई ( वय २५ ,दोघे रा.भाटशिरगाव) यांना शिराळा पोलिसांनी  अटक केली आहे. त्यांना  न्यायालयात हजर केले असता (ता.१)  जुलै अखेर पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरातीवेळी हवेत गोळीबार करताना एक जखमी | One injured while firing in the air during Varati

 ही घटना काल बुधवारी ( ता.२८ ) रोजी रात्री साडेआठ च्या दरम्यान घडली.याबाबत जखमी ऋतिक इंगळे याने शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की ,काल बुधवारी भाटशिरगाव येथे एक लग्न होते. त्या लग्नात रात्री साडेआठ च्या दरम्यान वरतीवेळी तरुणांचा   नाचण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी ऋतिक, त्याचा भाऊ अजय इंगळे,नातेवाईक सनी गायकवाड होते. त्यावेळी सेवानिवृत्त केंद्रीय राखीव पोलीस दलाचे  संजय देसाई यांचे रिव्हॉल्व्हर ओमकार देसाईने घेवून  एक गोळी हवेत उडवली. मात्र दुसरी गोळी उडवत असताना ती हवेत न उडता अचानक समोर असणाऱ्या ऋतिक इंगळेच्या डाव्या दंडाच्या वरील बाजूने  घुसून  दंडाच्या मागील बाजूने बाहेर पडली. यामध्ये ऋतिक  गंभीर जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे या कार्यक्रमात गोंधळ उडाला.

वरातीवेळी हवेत गोळीबार करताना एक जखमी | One injured while firing in the air during Varati

 जखमी ऋतिकला  तातडीने उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी डॉ.दीपक बनसोडे यांनी प्राथमिक उपचार केले. यानंतर पुढील उपचारासाठी  कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान काल  रात्री उशिरा दोघा संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना  आज गुरुवारी शिराळा येथील न्यायालयात हजर केले असता दोघांना १ जुलै अखेर पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये सरकारी वकील संदीप पाटील यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी घटनास्थळावरून  गुन्ह्यातील एक रिव्हॉल्व्हर , जखमी ऋतिकच्या अंगावरील , जर्किन , दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या  आहेत. पुढील तपास  पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार महेश गायकवाड हे करीत आहेत.

वरातीवेळी हवेत गोळीबार करताना एक जखमी | One injured while firing in the air during Varati

 जीवावर आलं अन दंडावर निभावलं 

ऋतिक  इंगळे हा युवक लग्नाला आला. त्या ठिकाणी सुरु असणाऱ्या वरातीत तो  सहभागी झाला. मात्र आपल्या बद्दल असं काय घडेल याची त्याला  पुसटशी ही जाणीव झाली नाही. आनंदाच्या भरात हवेत उडणारी गोळी एखाद्याच्या   जीवावर बेतेल याची  कल्पना ही कोणाच्या मनात आली नाही. पण ऋतिकचे  नशीब चांगले. ती गोळी दांडातून आरपार गेली.मात्र थोडी आतील बाजूने गेली असती तर हृदयाला लागून अनर्थ घडला असता .मात्र  जीवावर आलं अन दंडावर निभावलं. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

वरातीवेळी हवेत गोळीबार करताना एक जखमी | One injured while firing in the air during Varati

 


























Post a Comment

0 Comments