बहुआयामी नेतृत्व आमदार मानसिंगराव नाईक |Multifaceted leadership MLA Mansingrao Naik
बहुआयामी नेतृत्व आमदार मानसिंगराव नाईक |Multifaceted leadership MLA Mansingrao Naik
शिराळा तालुक्यात सहकाराची व्याप्ती वाढवत औद्योगीक क्रांतीत भर घालणारे नेतृत्व म्हणून आमदार मानसिंगराव नाईक यांचेकडे पाहिले जात आहे. विश्वास व विराज उद्योग समुहाच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या व औद्योगीक क्रांती करत पहिले समाजकारण मग राजकारण अशा उदात्त हेतूने काम करणाऱ्या अशा या बहुआयामी नेतृत्वाच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्यकतृत्वाचा घेतलेला हा आढावा .
बहुआयामी नेतृत्व आमदार मानसिंगराव नाईक |Multifaceted leadership MLA Mansingrao Naik
२६ जून रोजी मानसिंगराव नाईक यांचा जन्म आई लीलावती नाईक यांच्या पोटी चिखली येथे झाला . त्यांचे चिखली , कांदे , शिराळा येथे प्राथमिक शिक्षण झाले . फत्तेसिंगराव नाईक ( आप्पा ) कारखान्याची धुरा सांभाळत होते . त्यावेळी नैसर्गिक परिस्थिती , ऊस टंचाई , व आर्थिक अडचण असल्याने अनेक संकटावरती मात करणे सुरू होते . बंद कारखान्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष परिणाम नाईक कुटुंबीयांच्यावरती झाला होता . त्यावेळी भाऊंनी शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाकडे लक्ष दिले . चांदोली धरणामुळे या परिसरात झालेली पाण्याची सोय व अप्पांनी केलेली प्रयत्नांची शिकस्त यामुळे बंद कारखाना सुरू झाला . तालुक्याला विकासाला वेगळी वाट मिळाली . त्यावेळी भाऊंनी कारखान्यात ऊस व साखर वाहतूक केली . कारखाना सुरळीत सुरू असताना पुन्हा नाईक कुटुंबीयांच्यावरती आप्पा आजारी पडल्याने संकट आले . त्यावेळी कुटुंबाची जबाबदारी भाऊ च्यावरती आली .
बहुआयामी नेतृत्व आमदार मानसिंगराव नाईक |Multifaceted leadership MLA Mansingrao Naik
त्यांनी अप्पांच्या समवेत कारखान्यातील व्यवस्थापनाचे बारकावे आत्मसात केले . लोकांच्या गरजा पाहून आनंदराव नाईक , भागीरथीबाई नाईक पतसंस्था व आपला बझारची स्थापना केली . अल्पावधीत त्या संस्था प्रगतीपथावरती नेल्या . सन २००० मध्ये अप्पांनी कारखान्याच्या निवडणुकीची संपुर्णधुरा भाऊंच्यावरती सोपवली . त्यावेळी आपली कार्यक्षमता दाखवण्याची संधी त्यांना मिळाली . कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून सहकारात एक वेगळा पायंडा पाडला . तो पायंडा सलग पाचव्यांदा बिनविरोध करून पुन्हा सिद्ध करून दाखवला . १० फेब्रुवारी २००० रोजी त्यांची कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली . त्यावेळेपासून आज पर्यंत कारखान्याच्या नावलौकिकात दिवसेंदिवस भर पडत आहे . कारखान्याने अनेक राज्य व देश पातळीवरील पुरस्कार प्राप्त केले आहेत . कारखान्यास आय.एस.ओ.मानांकन मिळाले आहे . चांगल्या चालणाऱ्या कारखान्याच्या यादीत विश्वास कारखान्याचा समावेश आहे . कारखान्याची क्षमतेमध्ये वाढ केली असून विविध उपपदार्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर मोठ्या कारखान्यांच्या तुलनेत दर देण्याचे सातत्य कायम ठेवले आहे.विराज व विश्वास उद्योग समुहाच्या माध्यमातुन विधानसभा मतदार संधातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. २००९ व २०१९ ला विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून काम करण्याच्या मिळालेली संधीचे सोनं करत माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या सहकार्याने शिराळा विधानसभा मतदार संघात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिराळा पोलीस ठाणे, पंचायत समिती नूतन इमारत, शिराळा बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय इमारत ,आय.टी .आय .वसतिगृह इमारत बांधकाम असा दृष्टीक्षेपातील विकास साधून ,शैक्षणिक ,आरोग्य, रस्ते सुविधा, सभागृह,पिण्याच्या पाण्याची सुविधा चांगल्या प्रकारे कशा प्रकारे मिळतील यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. चांदोली पर्यटन विकास , शिराळा येथे भुईकोट किल्यावर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी, वाकुर्डे बुद्रुक योजना पूर्णत्वाकडे नेणे यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. अशा या ध्येयवेड्या नेतृत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सचिन देसाई ( लोकनियुक्त सरपंच गिरजवडे )
बहुआयामी नेतृत्व आमदार मानसिंगराव नाईक |Multifaceted leadership MLA Mansingrao Naik
कट
0 Comments