BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गहाळ झालेले मंगळसूत्र केले परत | Lost mangalsutra returned



गहाळ झालेले मंगळसूत्र केले परत | Lost mangalsutra returned

 शिराळा ,ता.२९: येथील श्री गोरक्षनाथ मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलेचे गहाळ झालेले  मंगळसूत्र प्रियांका प्रताप पाटील  (वय ५५, रा. चरण ) या महिलेने  व शिराळा पोलिसांनी प्रामाणिकपणे परत केले.याबाबत पोलीस व महिलेचे  उपस्थित नाथ भाविकांनी तोंड भरून कौतुक केले. सोने परत मिळाल्याने सोनं गहाळ झालेल्या महिलेने सुटकेचा श्वास सोडला.

गहाळ झालेले मंगळसूत्र केले परत | Lost mangalsutra returned

    याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की  गोरक्षनाथ मंदिरात पार्वती शंकर पाटील ( वय ६५ ,रा. चरण -बांबवडे (ता.शाहूवाडी , जि. कोल्हापूर) या वृद्ध महिलेचे मंगळसूत्र गहाळ झाले. सदर घटना दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. हे मंगळसूत्र प्रियांका प्रताप पाटील  यांना मिळाले.ते  त्यांनी शिराळा  पोलीस ठाण्याचे हवालदार सुभाष पाटील , हवालदार भाऊसाहेब कुंभार यांच्याकडे  दिले. पार्वती पाटील या मंगळसूत्र हरवले बाबत पोलीस ठाण्यात वर्दी दाखल करण्यासाठी आल्या.त्यावेळी   हवालदार सुभाष पाटील , हवालदार भाऊसाहेब कुंभार यांनी सदर मंगळसूत्राची ओळख पटल्यावर पार्वती पाटील यांना दिले.  या प्रामाणिक पणाबद्दल प्रियांका  पाटील , हवालदार कुंभार , हवालदार पाटील  यांचे उपस्थित भाविकांनी अभिनंदन केले.

गहाळ झालेले मंगळसूत्र केले परत | Lost mangalsutra returned



























Post a Comment

0 Comments