जमिनीची सुपीकता वाढवा | Increases soil fertility
शिराळा,ता,२८: जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब व जिवानुंची संख्या वाढवून जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे माती परीक्षण करून त्यानुसार शेणखत व रासायनिक खतांचा वापर करावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले .
जमिनीची सुपीकता वाढवा | Increases soil fertility
वाडीभागाई (ता.शिराळा) येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत दत्त मंदिर येथे शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच बाळाराम पाटील होते.
जमिनीची सुपीकता वाढवा | Increases soil fertilityy
यावेळी विश्वासराव नाईक सह. साखर कारखाण्याचे प्रयोगशाळा प्रमुख आशिष पवार यांनी शेतजमिनीचे आरोग्य व मातीपरीक्षणाची गरज व सेंद्रिय निविष्ठांचा भात शेतीमध्ये वापर या विषयी मार्गदर्शन केले. जमीन सुपीकता निर्देशांक टिकवण्यासाठी करावयाच्या उपायोजना, माती नमुना घेण्याची योग्य पद्धत, जमीन आरोग्य पत्रिका कशा पद्धतीने वाचन करावी, माती परीक्षणानुसार संतुलित खताचा वापर, सेंद्रिय कर्ब याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
जमिनीची सुपीकता वाढवा | Increases soil fertility
. विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब व जिवानुंची संख्या वाढवून जमिनीची सुपीकता वाढली जाते. माती परीक्षण करून त्यानुसार शेणखत व रासायनिक खतांचा वापर करावा. पाणी व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
जमिनीची सुपीकता वाढवा | Increases soil fertility
तालुका कृषि अधिकारी अरविंद शिंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती सांगितली. कृषि पर्यवेक्षक जे.के. खोत यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया विषयी सविस्तर माहिती दिली . प्रास्ताविक व्हि. व्हि. बजबळकर यांनी केले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत मोफत आलेल्या बाजरी व ज्वारी मिनीकीट बियाण्याचे वाटप कृषि सहाय्यक प्रवीण पाटील यांनी केले.यावेळी निवास पाटील, योगेश पाटील, कृषि सहाय्यक शंभूराजे भोसले , विशाल पाटील उपस्थित होते.
जमिनीची सुपीकता वाढवा | Increases soil fertility
0 Comments