BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या महाराजांच्या मुळे अखंड ४१ वर्षे सुरु आहे गोरक्षनाथ दिंडी |Gorakshanath Dindi has been going on for 41 years from this Maharaja

आषाढी एकादशी निमित्ताने  पंढरपूरला जाणाऱ्या शिराळा येथील  गोरक्षनाथ पायी  दिंडीचा  गेले ४१ वर्षा पासून अखंडित भक्तीमय वातारणात प्रवास सुरु आहे.

 देवराष्ट्रच्या स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग  बाळा वस्त्रे उर्फ  भडक महाराज यांनी चाळीस वर्षा पूर्वी ५५ वारकर्यांना घेवून सुरु केलेल्या दिंडीत आता दीड हजारावर वारकरी सहभागी होत असल्याने या दिंडीचा वटवृक्ष झाला आहे. 

या महाराजांच्या मुळे अखंड ४१ वर्षे सुरु आहे  गोरक्षनाथ दिंडी |Gorakshanath Dindi has been going on for 41 years from this Maharaja

   पूर्वी  शिराळा येथून  यादवराव देशमुख, किसान कदम, बाबुराव खुर्द महाराज, यांनी गोरक्षनाथ दिंडी सुरु केली होती. त्यानंतर पंधरा ते २० वर्षे दिंडीची परंपरा खंडित  झाली. ती पुन्हा सुरु करण्यासाठी १९८२ ला वारकरी असणारे भडक महाराज दिंडीच्या प्रचारासाठी शिराळ्यात आले.. त्यावेळी गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती शिवनाथ बाबा होते. शिराळा येथे दिंडीसुरु करण्यासाठी फिरत असणाऱ्या  भडक महाराज यांची  शिक्षक असणाऱ्या  कृष्णाजी बळवंत नलवडे यांच्याशी भेट झाली. त्यावेळी हनुमान भजनी मंडळ नायकुडपुरा व नाझरे भजनी मंडळ यांच्या सहकार्याने राजाराम खुर्द, शंकर  आळतेकर ,कृष्णाची नलवडे, विठ्ठल दुबुले, रघुनाथ गायकवाड, जयसिंगराव नलवडे, दिनकर नलवडे,. प्रकाश भोगावकर, स्वातंत्र्य सैनिक,पांडुरंग  गायकवाड, स्वातंत्र्य सैनिक, दत्तात्रय निकम यांच्या सह इतरानी पुढाकार घेवून नाथ मंदिर येथे ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले. त्यासाठी   पंढरपूर येथील सात फडातील सात प्रवचन व कीर्तनकार आणून  एक हजार  लोकांच्या महाप्रसादाचे आयोजन केले. 

या महाराजांच्या मुळे अखंड ४१ वर्षे सुरु आहे  गोरक्षनाथ दिंडी |Gorakshanath Dindi has been going on for 41 years from this Maharaja

त्यानंतर पंधरा दिवसात  भडक महाराजांच्या सहकार्याने १९८२ ला २० वर्षे खंडित झालेल्या गोरक्षनाथच्या  पायी दिंडीचा ५५ वारकर्या सह  पुन्हा शुभारंभ झाला. पालखी खांद्यावरून घेऊन निघालेत . साहित्यासाठी सोबत नारायण नलवडे यांची बैलगाडी होती. सलग दोन वर्षे बैलगाडी होती. त्यांतर पाच वर्षे शिराळच्या  वसंत शहा यांचा ट्रक होता. त्यानंतर शिराळा मल्लापा कानकात्रे  व त्यांचा  मुलगा  केशव कानकात्रे हे आपला ट्रक आज पर्यंत अखंडीत घेऊन जात आहेत. दिंडीची सुरुवात  गोरक्षनाथ   मंदिरापासून  सुरुवात होते. शिराळा येथील हनुमान मंदिरात नायकुडपुरा  येथे पहिला मुक्काम होतो.त्यानंतर अंबामाता मंदिर इस्लामपूर, देवराष्ट्रे सागरेश्वर, बेलवडे विठ्ठल मंदिर, चितळी विठ्ठल मंदिर, कुकुडवाड हनुमान मंदिर, म्हसवड  कानफटी मठ, पिलीव हनुमान मंदिर, भाळवणी चौंडेश्वरी मंदिर, भंडी शेगाव कवडेमळा वाखरी, असा मुक्काम करत शेवटी  पंढरपूर येथील भागवत सांप्रदायिक  सेवा मंडळ ३२  शिराळा नायकूडा यांच्या मठात दिंडीचा शेवटचा मुक्काम होतो. द्वादशीनंतर दिंड्या माघारी येतात.

या महाराजांच्या मुळे अखंड ४१ वर्षे सुरु आहे  गोरक्षनाथ दिंडी |Gorakshanath Dindi has been going on for 41 years from this Maharaja

 दिवसेन दिवस दिंडीच्या सेवा सुविधता बदल होऊ लागला आहे. आता दिंडीसोबत सजवलेला  गोरक्षनाथ रथ असतो.आमदार मानसिंगराव नाईक यांनी रथ दिलास असून त्यासाठी भगतसिंग नाईक यांनी लाईटसाठी जनरेटर दिला आहे.

 गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनाथ महाराज हे दिंडीचे चांगले नियोजन करत आहेत. वारकर्यांना चांगल्या सुविधा देत आहेत. शिराळा येथील बसस्थानका समोर अश्व रिंगण सोहळा साजरा करून दिंडी पंढरपूरकडे रवाना होते. कांदे, सागाव,मांगले,बिळाशी, साळशी,पिशवी,सरूड, आरळा, सोनवडे, शित्तूर, वाकुर्डे, पाडळी,अंत्री या गावातून ही छोट्या मोठ्या दिंड्या जात  असतात..

या महाराजांच्या मुळे अखंड ४१ वर्षे सुरु आहे  गोरक्षनाथ दिंडी |Gorakshanath Dindi has been going on for 41 years from this Maharaja

१९८२ पासून ३२ वर्षे दिंडी वारी केली. त्यामुळे प्रवचन,कीर्तनकार  झालो. आता वयामुळे गेले चार  वर्षे पायी दिंडी वारी खंडीत  झाली तरी महिन्याची वारी एस,टी ने जाऊन अखंडित  सुरु ठेवली आहे.

                                                          कृष्णाजी नलवडे (वारकरी ) 

या महाराजांच्या मुळे अखंड ४१ वर्षे सुरु आहे  गोरक्षनाथ दिंडी |Gorakshanath Dindi has been going on for 41 years from this Maharaja

Post a Comment

0 Comments