कष्टाचे चीज झाल्याने टीम तेंडल्याचे अश्रू अनावर |The team shed tears because of the hard work
कष्टाचे चीज झाल्याने टीम तेंडल्याचे अश्रू अनावर |The team shed tears because of the hard work
शिराळा,ता.४:शिराळा व वाळवा तालुक्यातील गावकुसातील कलाकारांच्या आठ वर्षाच्या अथक प्रयत्नातून तयार झालेला तेंडल्या हा चित्रपट आज महाराष्ट्रातील १०० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या प्रदर्शनाने आता पर्यंत केलेल्या कष्टाचे चीज झाल्याने या कलाकृतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या तेंडल्या टीमचे अश्रू अनावर झाले अन कलाकाराने सर्वांची मने जिंकली. त्याचे कारण ही तसेच आहे. कारण यात गावाकडचे लोकं क्रिकेटवर प्रेम कसे करतात आणि सचिन तेंडूलकरकडे फक्त एक खेळाडू म्हणून नव्हे तर प्रेरणास्त्रोत म्हणून कसे बघतात याचा दुहेरी संगम साधणारे कथानक आहे.
कष्टाचे चीज झाल्याने टीम तेंडल्याचे अश्रू अनावर |The team shed tears because of the hard work
यासाठी या टीमला चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे अनेक संकटाला समोरे जावे लागले.आणि शेवटी त्यांना यश मिळाले. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. इस्लामपूर येथील शिवपार्वती चित्रपटगृहात टीम तेंडल्याने व त्यांच्या नातवाईकानी सचिन........सचिन.........सचिन ......करत एकच जल्लोष केला. त्यामुळे आपल्या गावकुसातील कलाकारांची कलाकृती पहावीच लागेल. मग समजेल काय दम आहे या चित्रपटात ....
कष्टाचे चीज झाल्याने टीम तेंडल्याचे अश्रू अनावर |The team shed tears because of the hard work
0 Comments