BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्नीवर पतीचा खुनी हल्ला | Murderous attack of husband on wife

पत्नीवर पतीचा खुनी हल्ला | Murderous attack of husband on wife

पत्नीवर पतीचा खुनी हल्ला | Murderous attack of husband on wife

पत्नीवर पतीचा खुनी हल्ला | Murderous attack of husband on wife

शिराळा,ता.२९: शिराळा येथील खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या प्रियांका दिलीप गवळी ( वय ३०, सध्या रा. नाटोली) या महिलेवर कौटुंबिक वादातून पतीने धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी  केले. ही घटना आज सोमवार (ता.२९) रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली.

पत्नीवर पतीचा खुनी हल्ला | Murderous attack of husband on wife

  याबाबत  उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.जे.के. मोमीन यांनी शिराळा पोलिसांना माहिती दिली.याबाबत पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ,प्रियांका ह्या शिराळा येथील खाजगी रुग्णालयात कामास असून त्या नाटोली येथे माहेरी राहत आहेत.  त्या सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णाजवळ होत्या.त्यावेळी पती दिलीपने आत अचानक येऊन  प्रियांकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यात हल्ल्यात त्या जखमी झालेल्या. त्यांना तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्या गळा ,छाती , पोटावर जखमा झाल्याचे डॉ जे.के. मोमीन यांनी सांगितले. तिच्यावर प्राथमिक उपचार करून  पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार  करीत आहेत.

पत्नीवर पतीचा खुनी हल्ला | Murderous attack of husband on wife

Post a Comment

0 Comments