BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सोनवडे येथे गव्याचा मृत्यू |Death of cow in Sonawade

सोनवडे येथे गव्याचा मृत्यू |Death of cow in Sonawade



सोनवडे येथे गव्याचा मृत्यू |Death of cow in Sonawade

सोनवडे   पैकी भाष्टेवस्ती  ( ता.शिराळा) येथे  गव्याचा डाव्या कालव्यात पडल्याने पाण्यात बुडून  मृत्यू झाला. ही  घटना काल  सोमवार (ता. २९)  रोजी सकाळी १० वाजण्या पूर्वी घडली. सदर गव्याचा  पंचनामा करून त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सोनवडे येथे गव्याचा मृत्यू |Death of cow in Sonawade

    याबाबत घटनास्थळावरून व वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांचेकडून मिळालेली माहिती अशी की , चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून  शेतीसाठी पाणी सोडले  असल्याने  पाण्याचा  प्रवाह मोठ्या प्रमाणात  सुरू आहे. सोमवारी सकाळी १० च्या दरम्यान गवा सोनवडे येथे कालव्याच्या पाण्यात पडल्याची माहिती मिळताच सोनवडे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली . त्यावेळी गवा जिवंत होता. ग्रामस्थांनी याची कल्पना प्रादेशिक वनविभागाला दिली.

सोनवडे येथे गव्याचा मृत्यू |Death of cow in Sonawade

   यावेळी तातडीने वनक्षेत्रपाल महंतेश बगले ,मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनपाल चंद्रकांत देशमुख , वनरक्षक सुभाष पाटील , डॉ. राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.  पाण्याचा वेग जास्त असल्याने  गव्यास  बाहेर पडता आले नसल्याने  गव्याचा मृत्यू झाला. दरम्यान सदर मृत गवा पाण्याच्या प्रवाह बरोबर  वाहत आरळा गावच्या हद्दीत पोहचला होता. गव्याच्या शरीरावर खरचटल्याच्या खुणा दिसत होत्या यावरून गवा कालव्यात घसरून पडला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. सदर  गवा पाण्याच्या प्रवाहा बरोबर आरळा,कारुंगली,मराठेवाडी, काळुंद्रे गावापर्यंत वहात आला होता.  मृत गव्यास कालवा दुरुस्ती च्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या रस्त्या जवळून जेसीबी  व  स्थानिक नागरिक, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.  त्या ठिकाणी  शवविच्छेदन करून पंचनामा करून  दहन करण्यात आले. 

सोनवडे येथे गव्याचा मृत्यू |Death of cow in Sonawade











Post a Comment

0 Comments