BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

 शिराळा ,ता.२: इंगरुळ (ता.शिराळा) येथील सुरज भाऊसाहेब पाटील ( वय ३०) या युवकाचा  कपिलेश्वर (ता.राधानगरी) येथील मांगोली मार्गावरील ओढ्याजवळ असणाऱ्या जांभळाच्या झाडावरून पडून जागीच मृत्यू झाला. त्याचा सहा महिन्या पूर्वीच विवाह झाला होता. सूरजचा केवळ सहा महिन्यात अर्ध्यावर संसार मोडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

 ही घटना  सोमवारी (ता.१) रोजी  दुपारी तीन ते चारच्या दरम्यान  घडली. या बाबत विशाल वसंत पाटील यांनी पोलिसात वर्दी दिली आहे.  याबाबत  घटनास्थळ आणि पोलीसातून समजलेली माहिती अशी, सुरज यांची चार चाकी गाडी असून तो  राधानगरी येथील  नातेवाईक अरुण बाळासो अडके यांना भेटण्यासाठी गेला  होता.. त्यांना भेटून ते परत येत असताना  कपिलेश्वर गावाशेजारील मांगोली ओढ्याजवळ त्याला जांभळाचे झाड दिसले. जांभळे काढण्यासाठी  तो  झाडावर चढला असता  त्याच्या पायाखालील व हातात धरलेल्या दोन्ही  फांद्या  तूटून तो  ओढ्याच्या आरसीसी कठड्यावर पडल्याने  गंभीर दुखापत होऊन  ओढ्यातील  पाण्यात पडला. त्यामुळे त्यांचा जागीच मॄत्यु झाला.

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

   या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, कृष्णात यादव, प्रवीण गुरव, पोलीस पाटील वसुधा पाटील, मानसिंग काटकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशिरा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.  इंगरुळ येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आला .. सुरजच्या पश्चात आई , वडील , पत्नी , चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. 

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

 दोन दिवसात दोन कुटुंब मुलाला  पोरकी

शिराळा येथील  संस्कार लोहार या १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू रविवारी पाण्यात बुडून झाला होता .तो एकुलता एक होता. लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी इंगरूळ येथील सुरज पाटील या ३० वर्षाच्या युवकाचा जांभळे काढायला झाडावर चढला असताना फांदी मोडून खाली पडून मृत्यू झाला. तो ही एकुलता एक होता. सलग दोन दिवसात दोन कुटुंबाचे भविष्यातील आधार तुटल्याने दोन्ही कुटुंब मुलांना पोरके झाले आहेत. ही घटना हृदय पिटाळून टाकणारी आहे.

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

 वृद्धांचा आधार हरपला 

सुरजला चार बहिणी .पाचवा सुरज सर्वात लहान.त्याचा सहा महिन्यापूर्वी विवाह झाला. थकेलेले आई वडील, घरची शेती जेमतेम. कुटुंब सांभाळण्यासाठी घरी छोटे दुकान सुरु केले असले तरी ते ही जेमतेम चालत असल्याने त्याने चार वर्षापासून ओमणी गाडी घेवून भाडी करत होता. त्यावर तो कुटुंबाची गुजराण करत होता. मात्र सूरजच्या या दुर्दैवी मृत्यूने त्याच्या आई वडिलांचा  म्हतारपणीचा आधारच हरपला आहे.

झाडावरून पडून मृत्यू | Death of a youth after falling from a tree

Post a Comment

0 Comments