BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाण्यावर ओंडक्या प्रमाणे तरंगणारा अवलिया |Avaliya floating on water like a wooden egg

पाण्यावर ओंडक्या प्रमाणे तरंगणारा अवलिया |Avaliya floating on water like a wooden egg

पाण्यावर ओंडक्या प्रमाणे तरंगणारा अवलिया |Avaliya floating on water like a wooden egg

व्हिडिओ पहा 👇👇 

पाण्यावर ओंडक्या प्रमाणे तरंगणारा अवलिया |Avaliya floating on water like a wooden egg

प्रत्येक माणसाजवळ कोणती ना कोणती कला असते. मग ती कला अवगत केलेली असो वा उपजत असो. त्या कलेच्या माध्यमातून अनेकजण नावारूपास आले आहेत. पाण्यात पडले  की पोहता येते ही म्हण सर्वत्र रूढ आहे. पण  पाण्यात पडलं की सरावाने हातपाय न हलवता उलटे तरंगता येते हे सिद्ध झाले आहे.  शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील संदीप  डिगे या युवकाने  एखाद्या लाकडी ओंडक्या प्रमाणे हातपाय न हलवता केवळ पाण्यावर तरंगण्याची कला जोपासली आहे. त्याची ही अनोखी कला सध्या समाज माध्यमातून धुमाकूळ घालू लागली आहे. संदीपच्या या कलेने शिराळा तालुक्याच्या नाव लौकिकत आणखी एक भर  घातली आहे.

पाण्यावर ओंडक्या प्रमाणे तरंगणारा अवलिया |Avaliya floating on water like a wooden egg

 शिराळा तालुक्याचा नागपंचमी,चांदोली राष्ट्रीय उद्या, गोरक्षनाथ मंदिर, समर्थ रामदास स्वामी स्थापित ११ मारुती पैकी एक मारुती मंदिर,कुस्ती क्षेत्रात हिंदीकेसरी अर्जुनवीर गणपतराव आंदळकर, आय.पी.एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील,साहित्य क्षेत्रात सोनाली नावांगुळ यांच्यामुळे नावलौकिक वाढला आहे.त्यात आता संदीप यांच्या अनोख्या कलने भर पडू लागली आहे.

पाण्यावर ओंडक्या प्रमाणे तरंगणारा अवलिया |Avaliya floating on water like a wooden egg

संदीप हा शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील मोरेवाडी या गावचा युवक सध्या नवी मुंबईमध्ये प्रायमेटल्स टेक्नॉलॉजी या नामांकित बहुराष्ट्रीय संस्थेमध्ये यांत्रिक क्षेत्रात यंत्रचालक या पदावर कार्यरत आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी पोहायला शिकला.पोहत असताना पाण्यावर उलटे पोहण्याचा प्रयत्न कर असताना आपण हातपाय न हलवता पाण्यावर सहज तरंगु शकतो याची जाणीव झाली.त्यानुसार त्याने सराव केला. आता सततच्या सरावाणे नदी,कालवा,विहीर,स्विमिंग टॅंक येथे  एखाद्या लाकडी ओंडक्या प्रमाणे पाण्यावर सहज तरंगत राहतात. याच बरोबर संदीप यांनी प्रायमेटल्स टेक्नॉलॉजी संस्थे मार्फत मुंबई व नवी मुंबईत होणाऱ्या विविध पाच किलोमीटर, दहा किलोमीटर  मॅरेथॉन स्पधेॅत सहभागी होऊन  विजेतेपद पटकावले आहे.

पाण्यावर ओंडक्या प्रमाणे तरंगणारा अवलिया |Avaliya floating on water like a wooden egg

लहानपणी पोहायला जात असताना उलटे पोहत असताना मी पाण्यावर तरंगू लागलो.मला आश्चर्य वाटले.मग मी सतत त्याचा सराव केला. आता मी बराचवेळ लाकडी ओंडक्या प्रमाणे सहज पाण्यावर तरंगत असतो. याचे लोकांना कुतूहल वाटू लागले आहे. अनेकांना हा चमत्कार वाटत असला तरी हा चमत्कार नसून हे सरावाने सहज शक्य आहे. आता लोकांचे कुतूहल वाढू लागल्याने  जास्ती जास्त किती तास तरंगू शकतो हे पाहणार आहे.

संदीप डिगे 

Post a Comment

0 Comments