शिराळा तालुक्यात एकाच दिवशी दोन बिबट्यांचे दर्शन | Sighting of two leopards on the same day in Shirala taluka

शिराळा,ता.२७: शिराळा येथील औद्योगिक वसाहत परिसरात खेड हद्दीत व फकीरवाडी ता.शिराळा अशा एकाच दिवशी दोन ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. यावेळी वनविभागाचे वनरक्षक हणमंत पाटील हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी सदर परिसराची पाहणी केली परंतु घटनास्थळावरून बिबट्यांनी पलायन केले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खेड (ता.शिराळा) येथील विक्रम पाटील यांच्या कुंभारकी नामक शेतात सरुड (ता.शाहूवाडी) येथील महिला पाचच्या सुमारास उसाचा पाला काढत होत्या . यावेळी मंगल बंडगर, संगीता भोपळे रा. सरुड व बापू निवृत्ती पाटील रा.खेड यांना पुर्ण वाढ झालेला बिबट्या समोरच ऊसाच्या सरीत बसलेला दिसला. यावेळी बिबट्याला पाहून सर्वांनी आरडाओरडा केला. घटनास्थळी बिबट्याचे ठसे व केस आढळून आले. वनरक्षक हणमंत पाटील, अखिल भारतीय जैन संघटने उपाध्यक्ष विकास शहा, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस, माजी प्राचार्य विठ्ठल नलवडे, डॉ शिवाजीराव चौगुले यांनी बिबट्याचा शोध घेतला. फकिरवाडी (ता.शिराळा) येथे मांगलेचे माजी सरपंच उदय पाटील यांच्या पेट्रोल पंपाच्या मागे असणाऱ्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या व दोन बछडी दिसली.
शेतकऱ्यांनी उसात अथवा इतर ठिकाणी काम करताना त्या ठिकाणी लहान मुलांना सोबत घेवून जाऊ नये. शेतात काम करताना समूहाने जावे. एकमेकांशी बोलत रहावे. त्यामुळे माणसांच्या आवाजामुळे बिबट्या दूर जातो. कोणी ही त्यास हुसकावण्याचा प्रयत्न करू नये .वनविभागाला त्वरित माहिती द्यावी .
वनरक्षक हणमंत पाटील
शिराळा तालुक्यात एकाच दिवशी दोन बिबट्यांचे दर्शन | Sighting of two leopards on the same day in Shirala taluka
0 Comments