BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांचे अंगण बनले मेस आणि वसतिगृह | Their yard became a mess and a dormitory

त्यांचे अंगण बनले  पक्षांची मेस आणि वसतिगृह  | Their yard became a mess and a dormitory

 त्यांचे अंगण बनले  पक्षांची मेस आणि वसतिगृह  | Their yard became a mess and a dormitory

 त्यांचे अंगण बनले  पक्षांची मेस आणि वसतिगृह  | Their yard became a mess and a dormitory

शिराळा : निसर्गातील अन्नसाखळीमध्ये प्राणी पक्षांचा अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने वारणावती तालुका शिराळा येथील पक्षी मित्र आष्पाक आत्तार यांनी आपल्या अंगणामध्ये पक्षांसाठी घरटी बनवली आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण या पक्षांसाठी अन्नपाण्याची तजवीज करतात. त्यामुळे त्यांच्या अंगणामध्ये अनेक प्रकारचे पक्षी वावरत असतात. त्यामुळे त्यांचे अंगण बनले पक्षांची हक्काची  मेस आणि वसतिगृह

 त्यांचे अंगण बनले  पक्षांची मेस आणि वसतिगृह  | Their yard became a mess and a dormitory

या पक्षांच्या जोडीला आता मनमोहक मोराची ही भर पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून एक सुंदर मयूर दररोज त्यांच्या अंगणामध्ये येतो आहे. सकाळ संध्याकाळ न चुकता त्याची हजेरी लागत आहे.त्याच्यासाठी अंगणामध्ये ज्वारी, गहू, बाजरी,भात, भाकरी, चपाती असे अनेक पदार्थ दररोज ठेवलेले असतात. मयूर दररोज सकाळी व संध्याकाळी न चुकता आष्पाक आत्तार यांच्या अंगणात येऊन त्याच्यासाठी ठेवलेलं धान्य नी संकोचपणे ग्रहण करून निघून जातो आहे.

 त्यांचे अंगण बनले  पक्षांची मेस आणि वसतिगृह  | Their yard became a mess and a dormitory

अत्यंत लाजरा, देखना आणि माणसापासून दूर राहणारा हा पक्षी आत्तार कुटुंबीयांच्या सहवासात आल्यामुळे माणसाळल्याचे चित्र आहे. पक्षीमित्र आष्पाक आत्तार यांच्या वहिनी शबनम  आत्तार तर या मोराला एका विशिष्ट आवाजामध्ये बोलावतात. त्यामुळे तोही जिथे असेल तिथून परत फिरून अंगणामध्ये येतो. पक्षी मित्र आष्पाक आत्तार  व त्यांच्या कुटुंबांचं या मयुरा सोबत निर्माण झालेले नातं समाजासाठी प्रेरणादायी आहे.

 त्यांचे अंगण बनले  पक्षांची मेस आणि वसतिगृह  | Their yard became a mess and a dormitory

ज्या दिवशी अंगणामध्ये धान्य दिसत नाही त्या दिवशी हा मोर त्यांच्या घरावर जाऊन ओरडतो आहे त्याचा केकारव ऐकायला मिळाल्यावर सर्वांनाच तो आल्याची जाणीव होत आहे. त्याच्या अन्नपाण्याची तजवीज झाली की तो ते ग्रहण करून आल्यापावली परत जातो आहे.

 त्यांचे अंगण बनले  पक्षांची मेस आणि वसतिगृह  | Their yard became a mess and a dormitory

चांदोली हा निसर्गरम्य परिसर आहे. येथे जवळच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे अनेक प्राणी पक्षांचे येथे वास्तव्य आहे.मात्र वारणावती वसाहतीमध्ये पक्षी मित्र आत्तार यांच्या अंगणात येणारा मयूर दुर्मिळच आहे. त्याच्या आगमनामुळे त्यांच्या अंगणाची शोभा वाढली असून सर्वांनाच आनंद मिळत आहे. प्राणी पक्षांवर प्रेम करा, त्यांच्यावर दया दाखवा तेही आपल्यावर प्रेम करतील याची प्रचिती देणारा हा प्रसंग असल्याचे पक्षीमित्र  सांगतात.

 त्यांचे अंगण बनले  पक्षांची मेस आणि वसतिगृह  | Their yard became a mess and a dormitory

Post a Comment

0 Comments