BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सोनाली प्रकाश नवांगुळ भारत निवडणूक आयोगाच्या ‍राज्य आयकॉन | State Icon of Election Commission of India by Sonali Prakash Nawangul

 शिराळा,ता.२१: साहित्यअकादमी पुरस्कार प्राप्त शिराळची सुकन्या लेखिका सोनाली प्रकाश नवांगुळ यांची  भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाच्या राज्यभर व्यापक प्रचार  व प्रसिद्धीसाठी  ‍‌राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केल्याने शिराळकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरारोवला आहे. त्यांच्या या निवडीचे पत्र अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिले आहे.  

सोनाली प्रकाश नवांगुळ भारत निवडणूक आयोगाच्या  ‍राज्य आयकॉन | State Icon of Election Commission of India by Sonali Prakash Nawangul  

   सोनाली  ह्या मुळच्या शिराळा येथील आहे. त्या सध्या कोल्हापूर येथे रहातात.त्या  गेली १५  वर्षे लेखन व मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची आजवर पाच अनुवादित व तीन स्वत:ची अशी मिळून एकूण आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा स्वत:चा असा एक वाचकवर्ग संपूर्ण महाराष्ट्रभरात निर्माण झाला आहे. मनोविकास, मेनका, साधना अशा महाराष्ट्रातील मान्यवर प्रकाशनसंस्थांकडून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.तमीळ लेखिका  सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा  मराठी अनुवाद म्हणजेच मध्यरात्री नंतरचे तास या अनुवादित कादंबरीला नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार सोनाली यांना मिळाला आहे.. प्रथम बुक्सकडून इ बुक स्वरूपात प्रकाशित होणार्‍या लहान मुलांसाठीच्या तीन पुस्तकांचे अनुवाद ऑनलाईन उपलब्ध आहेत.‘स्टोरीटेल’ या अ‍ॅपसाठी लहान मुलांच्या व मोठ्यांच्या गोष्टींसाठीचे अनुवाद त्यांनी केले आहेत.विंग कमांडर अशोक लिमये यांच्या ‘द फिनिक्स रायजेस’ या साहसी व प्रेरणादायी जीवनपटाचा अनुभव अनुवादरूपात राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशनाकडून व ‘द मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर - महिमभट्ट’ या साहित्य अकादमीकृत पुस्तकाच्या सी.राजेंद्रन लिखित इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर आहे.त्यांच्या ‘ड्रीमरनर’, ‘स्वच्छंद’, ‘जॉयस्टिक’ या पुस्तकांसाठी मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कार त्यांना लाभले आहेत. २०२०  या वर्षाचा साहित्य अकादेमीचा अनुवादविषयक पुरस्कार त्यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित पुस्तकाला मिळाला. लेखनकार्यातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल २०२३ ला  चा ‘महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका’ यांचा विशेष पुरस्कार मिळाला  आहे.

सोनाली प्रकाश नवांगुळ भारत निवडणूक आयोगाच्या  ‍राज्य आयकॉन | State Icon of Election Commission of India by Sonali Prakash Nawangul  

 मराठी भाषेतील पहिले नोंदणीकृत ब्रेल पाक्षिक ‘स्पर्शज्ञान’ साठी उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी स्वागत थोरात यांच्यामुळे सोनाली यांना मिळाली आणि आता गेली पंधरा वर्षे त्या ‘स्पर्शज्ञान’साठी काम करत आहेत.  ‘अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद सोनाली यांनी भूषविले. वयाच्या नवव्या वर्षी झालेल्या अपघातात पॅराप्लेजिया होऊन कायमस्वरुपी अपंगत्व वाट्याला आले तरी स्वअभ्यास पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून सोनाली समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वावलंबी आयुष्य जगत आहेत.  नुकत्याच मुंबईत संपन्न झालेल्या दहाव्या ‘स्वयं टॉक’ या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ‘अपंगत्व आणि लैंगिकता’ या विषयावर मांडणी केली. यांच्या या विविधांगी कामाची दाखल घेवून त्यांची राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे.

सोनाली प्रकाश नवांगुळ भारत निवडणूक आयोगाच्या  ‍राज्य आयकॉन | State Icon of Election Commission of India by Sonali Prakash Nawangul  

Post a Comment

0 Comments