BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी वचक ठेवा |Officials should keep a watch on the contractors

शिराळा,ता.१९: टंचाई आढावा बैठकीला न येणाऱ्या ठेकेदारांची बिले देऊ नका. कामे न करणाऱ्यांची नावे काळ्या यादीत टाकण्यासाठीचा प्रस्ताव तयार करा .टंचाई काळात ज्या ठिकाणी विद्युत कनेक्शन ची गरज आहे त्या ठिकाणी तात्काळ कनेक्शन द्या.शिराळा तालुक्यातील एकाही गावामध्ये पाणीटंचाई होऊ नये याची दक्षता घ्या.ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी वचक ठेवा असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी वचक ठेवा |Officials should keep a watch on the contractors

   येथील पंचायत समिती सभागृहात जनजीवन मिशन व पाणीटंचाई बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील , गटविकास अधिकारी संतोष राऊत ,छोटे पाटबंधारे उपविभागीय  अधिकारी  प्रवीण तेली यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी वचक ठेवा |Officials should keep a watch on the contractors

यावेळी आमदार नाईक यांनी प्रत्येक गावे , वाड्यावस्तीवर असणाऱ्या पाणी टंचाई बाबत आढावा घेतला. टंचाईग्रस्त गावात  टँकर सुरू होणे अवघड आहे त्यामुळे विहिरी अधिग्रहण करा , बोअर मारा , त्यांची दुरुस्ती करा,  तातडीने आवश्यक तेथे एक दोन दिवसात वीज कनेक्शन द्या मात्र नागरिकांना पाण्याची टंचाई भासता कामा नये.

ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी वचक ठेवा |Officials should keep a watch on the contractors

यावेळी शिरसटवाडी येथील विहिरीचे काम ठेकेदार यांनी काम सुरू केले नाही. ते काम ठेकेदाराने उद्या सुरू करावे.झोळेवाडी येथे विद्युत कनेक्शन जोडणे गरजेचे आहे. गवळेवाडी येथील कांबळेवस्ती येथे पाणी टंचाई आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या खासगी कुपनलिकेचे टंचाई काळात बील ग्रामपंचायत मधून भरावे, शिराळा उत्तर भागात असणाऱ्या अनेक गावांत टंचाई जाणवू नये यासाठी गिरजवडे एम. आय. टॅंक मधून सोडावे.मेणी बौद्धवस्ती येथे कूपनलिका अधिग्रहण करावी.  पाडळेवाडी येथील पाणी योजनेचे काम सहा महिने बंद असून ते त्वरित सुरू करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार यांना देण्यात आला आहे. बांबवडे येथील ओढ्याकाठी विहीर असल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली असल्याने सध्या त्या ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. त्या विहिरीला आडव्या बोअर मारण्याची गरज आहे.करमाळे गावाला ४० टक्के पाणी टंचाई आहे. त्यासाठी असणाऱ्या विहिरीची खुदाई करण्याची गरज आहे या बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी वचक ठेवा |Officials should keep a watch on the contractors

   यावेळी वीज वितरण चे उपअभियंता प्रल्हाद बुचडे ,गट शिक्षणाधिकारी अरविंद माने , शाखा अभियंता बाहुबली हुक्केरी , प्रल्हाद पाटील ,सरपंच , सदस्य , ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

ठेकेदारांवर अधिकाऱ्यांनी वचक ठेवा |Officials should keep a watch on the contractors

Post a Comment

0 Comments