BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities

जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती 

खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबाजार समिती निवडणूक 
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities 

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities 

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities 

शिराळा ,ता.१४ : शिराळा तालुक्यात शाळा,महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची   जयंती विविध उपक्रमांनी व शांततेत साजरी करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमिताने  शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे बाह्यवळण रस्त्यावर राकेश कांबळे यांनी सैराट वडापावच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत वडापावचे वाटप केले.    

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities 

शिराळा येथे बौध्द विहारामध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना  जयंतीनिमित्त सिध्दार्थ तरुण मिञ मंडळ, विविध पक्ष संघटना , सामाजिक कार्यकर्ते, व्यापार वर्ग, युवक संघटनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.सिद्धार्थ तरुण मित्र मंडळाच्या वतीने  वक्तृत्व, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  स्पर्धेचे बक्षीस वितरण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य मंगेश कांबळे यांच्या हस्ते झाले. वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष  वसंत कांबळे यांच्या डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.  ज्योतीराम दळवी, सुरज कांबळे,सचिन बनसोडे, राकेश कांबळे, ,सुशांत कांबळे. प्रतीक कांबळे,वैभव कांबळे  उपस्थित होते.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities

शिराळा येथे  डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी.सरपंच देवेंद्र पाटील, गजानन सोनटक्के, माजी  उपनगराध्यक्ष विजय दळवी, माजी नगरसेवक गौतम पोटे, माजी नगरसेवक संजय हिरवडेकर, माजी पं.स.सदस्य लालासो तांबीट, माजी .ग्रा.पं.सदस्य अशोक दळवी, आदेश कांबळे, शिराळा युवक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, कुंभार समाजाचे वैभव कुंभार, शिराळा टमटम युनियन चे अध्यक्ष विजय सातपुते, परीट समाजाचे अध्यक्ष रवी यादव, नितीन कांबळे, अभि कांबळे, आनंद कांबळे, योगेश कांबळे ,धर्मेंद्र आलेकर, प्रकाश शिंदे, प्रवीण सवाईराम, संदिप कांबळे उपस्थित होते.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities 

टाकवे येथील जिल्हा परिषद शाळेत  रिलायन्स जिओ कंपनीचे मॅनेजर नेताजीराव जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले .यावेळी श्रीमयी सुतार, ,सानवी झिमूर या विध्यार्थीनीनी  मनोगत व्यक्त केले .  स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार पाटील यांनी केले आभार ग्रामपंचायत सदस्य विद्या बनसोडे यांनी मानले. 

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities

तरुण मित्र मंडळ तालुका वाचनालय शिराळा येथे  वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे कोषाध्यक्ष दिनेश हसबनीस, सदस्य उमेश कुलकर्णी वाचनालयाचे सेवक वर्ग व वाचक उपस्थित होते. 

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities 

शिराळा तालुक्यातील मणदूर,सोनवडे,आरळा, चरण, शेडगेवाडी,येळापूर,मेणी, वाकुर्डे, अंत्री, बांबवडे, शिरशी,टाकवे, पाडळी , बिऊर, तडवळे, सागाव, कांदे, चिखली, नाटोली, कणदूर, पुनवत , बिळाशी, मांगरूळ ,कोकरूड, चिंचोली, पं.त.शिराळा, भाटशिरगाव,खेड,रेड, भटवाडी आदि गावात विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी |Dr. Babasaheb Ambedkar Jayanti is celebrated with various activities 

Post a Comment

0 Comments