अंत्री खुर्दच्या मैदानात कुस्ती बरोबरीत |Wrestling draw in Antri Khurd Maidan
अंत्री खुर्दच्या मैदानात कुस्ती बरोबरीत |Wrestling draw in Antri Khurd Maidan
जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बाजार समिती निवडणूक |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
शिराळा ,ता.१२: अंत्री खुर्द (ता.शिराळा) येथील श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रे निमित्त आयोजित कुस्ती मैदानात पै.विकास पाटील विरुद्ध पै.अरुण बोगाडेॅ यांच्यात प्रथम क्रमांकाची झालेली अटीतटीची कुस्ती बरोबरीने सोडविण्यात आली.
अंत्री खुर्दच्या मैदानात कुस्ती बरोबरीत |Wrestling draw in Antri Khurd Maidan
दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अजय निकमवर रियाज नदाफने ऐकचाक डावावर विजय मिळवला. .तृतीय क्रमांकाच्या कुस्ती मध्ये सूरज पाटील विरुद्ध आदित्य कांबळे यांच्यातील लढतीत आदीत्य कांबळे गुणावर विजय मिळवला. .चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ओंकार जाधवने भरत चव्हाण वर गुणावर विजय मिळविला. पाचव्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत धिरज पाटीलने हर्षद दानोळेवर एकचाक डावावर विजय मिळवला.
अंत्री खुर्दच्या मैदानात कुस्ती बरोबरीत |Wrestling draw in Antri Khurd Maidan
प्रारंभी कुस्ती मैदानाचे उद्घाटन वस्ताद सुदाम पाटील, सरपंच दिलीप पाटील, प्रचिती दूध संघाचे संचालक संजय पाटील, मातोश्री पतसंस्थाचे संस्थापक उत्तम पाटील, संजय सपकाळ, फौजी बाळासाहेब पाटील, हणमंत पाटील, धोंडीराम पाटील,फौजी विनायक पवार, सचिन केसरकर, उपसरपंच अश्विन पाटील, ग्रा.प.सदस्य जितेंद्र पाटील, नानासो पाटील, रघुनाथ पाटील, शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानातील इतर विजयी मल्ल असे-- संकेत पाटील,संदीप बंडगर, शंभुराज चव्हाण, मयूर पाटील, ऋषिकेश पाटील, प्रदीप पाटील, विशाल पाटील, शभूराज पाटील, गणेश पाटील, राजवर्धन पाटील, राहूल माने, अतुल चौगुले, प्रदीप पाटील, राजवर्धन पाटील,दिगंबर पाटील, अतुल चौगुले.मैदानात पंच म्हणून अरुण मूळीक, फौजी विजय पाटील, तात्यासो पाटील, डॉ.सुनिल पाटील, नामदेव पाटील, राहुल मोरे, सतिश चव्हाण,वाय .बी.पाटील, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, ओमकार पाटील यांनी काम पाहिले.
अंत्री खुर्दच्या मैदानात कुस्ती बरोबरीत |Wrestling draw in Antri Khurd Maidan
या मैदानासाठी पी .एस .आय अशोक चव्हाण, भाजपा उपाध्यक्ष प्रतापसिंह चव्हाण, माजी प. स. सदस्य तुकाराम कुंभार, रिद्धी सिद्धी पतसंस्थेचेे अध्यक्ष मनोहर पाटील, महाव्यवस्थापक अशोक पाटील,पोलिस अधिकारी मा. शा. पाटील, संचालक आनंदराव पाटील, माजी सरपंच पांडुरंग पाटील, राजेंद्र चौगुले, तात्यासो पाटील, संजय पाटील, उदय माने, कुंडलिक गायकवाड,गोरख मुळीक उपस्थित होते. समालोचन ईश्वरा पाटील यांनी केले.
अंत्री खुर्दच्या मैदानात कुस्ती बरोबरीत |Wrestling draw in Antri Khurd Maidan
मल्लांना तुप
अंत्री खुर्द गावातील कुस्ती मैदानात प्रचिती दूध संघाचे संचालक संजय पाटील व अर्जुन पाटील यांच्याकडून सर्व विजयी व पराजीत मल्लांना अर्धा किलो तूप देण्यात आले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंत्री खुर्दच्या मैदानात कुस्ती बरोबरीत |Wrestling draw in Antri Khurd Maidan
0 Comments