जाणून घ्या ग्रामपंचायत,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि बाजार समितीची माहिती
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बाजार समिती निवडणूक |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
----------------------
आज गोरक्षनाथ यात्रेचा पहिला दिवस | Today is the first day of Gorakshanath Yatra
आज गोरक्षनाथ यात्रेचा पहिला दिवस | Today is the first day of Gorakshanath Yatra
शिराळा,ता.१५:शिराळ्या पासून दोन किलोमीटर अंतरावर तोरणा व मोरणा नदीच्या संगमावर गोरक्षनाथांचे मंदिर आहे.या ठिकाणाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. ज्या लोकांना आषाढी यात्रेला पंढरपूरला जाता येत नाही ते लोक येथे नाथ दर्शनाला येतात.कारण या एकादशीला स्वतः विठ्ठल गोरक्षनाथ यांच्या दर्शनाला व स्नानान करण्यासाठी येतात. त्यांचे दिवसभर येथे त्यांचे वास्तव्य असते अशी आख्यायिका आहे. येथे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो भाविकांची गर्दी असते. असा या गोरक्षनाथांची यात्रा आज १६ एप्रिल पासून सुरु होत असून सात दिवस भरणार आहे. त्या निमित्त .......
आज गोरक्षनाथ यात्रेचा पहिला दिवस | Today is the first day of Gorakshanath Yatra
हनुमान जन्मोत्सवा नंतर येणाऱ्या एकादशी पासून यात्रेस प्रारंभ होतो."ही यात्रा ९ दिवस सुरू असते. यात्रेच्या पहिल्या दिवशी राज्यातील विविध भागातून वारकरी दिंड्या येतात. शनिवारी मध्यरात्री तीन वाजता गोरक्षनाथ यांना महाअभिषेक घालून आरती केली जाते.आज रविवारी सकाळी ७ ते९ पर्यत पालखीची मिरवणूक शिराळा गावातून काढली जाते. तिसऱ्या दिवशी सवाद्य मिरवणुकीने दहीहंडी निघते. शिराळ्यात गोरक्षनाथ यांनीच जिवंत नागाची पूजा सुरू केल्याची आख्यायिका आहे. नाथ शिराळा येथे महाजन यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले.त्यावेळी महिलेस भिक्षा देण्यास वेळ का झाला असे नाथांनी विचारले. त्यावेळी मी मातीच्या नागाची पूजा करत असल्याचे कारण महिलेने सांगितले.त्यावेळी तू जिवंत नागाची पूजा करशील का असे नाथांनी विचारताच महिलेने होकार दिला.त्या ठिकाणी जिवंत नाग प्रकट झाला.त्या वेळे पासून शिराळ्यात जिवंत नाग पूजा सुरू झाली. पूर्वी येथे गोशाळा होती.त्या नंतर ती बंद झाली. सध्याचे मठाधिपती पारसनाथ महाराज यांनी गो शाळा पुन्हा सुरू केली आहे. त्यांच्या हाती मठाचा कारभार आल्या पासून त्यांच्या माध्यमातून आनंदनाथ महाराज यांनी मठ परिसराचा कायापालट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
आज गोरक्षनाथ यात्रेचा पहिला दिवस | Today is the first day of Gorakshanath Yatra
शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी वारकऱ्यासाठी एक टन शाबु खिचड़ी वाटपा साठी दिला आहे. खासदार संजय काका पाटील व आमदार विनय कौरे यांनी गोरक्षनाथ मंदिर परिसरात विद्युत रोषणाई साठी १२ विद्युत पोलची सोय केली आहे. मुख्याधिकारी योगेश पाटील व खासदार संजय काका पाटील पाण्यासाठी कुपनलिकेची सोय केली आहे. आमदार विनय कोरे यांनी भाविकांच्यासाठी थंड पाण्याच्या टँकरची सोय केली आहे. यात्रा कालावधीत सरकारी कर्मचारी व साधू संत यांच्या जेवणाची सोय खासदार संजय काका पाटील व वारणा बँकेचे अध्यक्ष विश्वेश कोरे यांनी केली आहे. आठ दिवस लागणाऱ्या पाच हजार पाणी बाटलीची व्यवस्था स्वप्निल निकम व संतोष हिरुगडे यांनी केली आहे.
आज गोरक्षनाथ यात्रेचा पहिला दिवस | Today is the first day of Gorakshanath Yatra
0 Comments